IPL 2025 : बटलर आउट, मेंडिस इन: गुजरात टायटन्सचा प्लेऑफसाठी मास्टर प्लॅन, काय आहे कारण?

Kusal Mendis Replaces Jos Buttler in Gujarat Titans for IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावामुळे स्थगित करण्यात आलेला आयपीएल २०२५ चा उर्वरित हंगाम १७ मे पासून सुरु होणार आहे. ज्यामुळे परदेशी खेळाडू मायदेशी परतले होते. त्यापैकी आता काही खेळाडूंनी उर्वरित हंगामासाठी परतणा नसल्याने, संघांनी बदली खेळाडूंना संधी देण्याचा धडाका लावला आहे. ज्यामध्ये गुजरात टायटन्सने जोस बटलर उर्वरित हंगामासाठी येणार नसल्याने त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून श्रीलंकेच्या कुसल मेंडिसला संधी दिली आहे. मात्र, याबाबत त्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
बटलरच्या जागी मेंडिसला संधी –
खरंतर, इंग्लंड संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये बटलरला भाग घेण्यासाठी परत जावे लागेल. ही परिस्थिती लक्षात घेता, गुजरात टायटन्सने प्लेऑफ सामन्यांसाठी बटलरच्या जागी श्रीलंकेचा टक यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. जो गेल्या आठवड्यापर्यंत पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत होता, ज्यामध्ये त्याने ७ मे रोजी त्याचा शेवटचा सामना खेळला होता.
🚨 KUSAL MENDIS TO GUJARAT TITANS 🚨
– Kusal Mendis is likely to replace Jos Buttler for IPL Play-offs. [NewsWire] pic.twitter.com/nnjX4zV8pq
— Johns. (@CricCrazyJohns) May 15, 2025
कुसल मेंडिस पीएसएल २०२५ साठी परतणार नाही –
कुसल मेंडिसने पीएसएल २०२५ मध्ये ७ मे रोजी त्याचा शेवटचा सामना खेळला होता. दरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मेंडिस आता उर्वरित पीएसएल सामन्यांमध्ये खेळण्यासाठी परतणार नाही. आता त्याला आयपीएलमध्ये चांगली संधी मिळाली आहे, ज्यामध्ये तो बऱ्याच काळापासून खेळू इच्छित होता. गुजरात टायटन्स संघाने अद्याप अधिकृतपणे प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केलेले नसले तरी, ते सध्या ११ सामन्यांत ८ विजयांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि एका विजयासह, प्लेऑफसाठी त्यांचे स्थान पूर्णपणे निश्चित होईल. अजूनही त्यांचे लीग टप्प्यातील तीन सामने शिल्लक आहेत.
कुसल मेंडिसची आतापर्यंतची टी-२० कारकीर्द –
कुसल मेंडिसच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत १७२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३०.२४ च्या सरासरीने ४७१८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतकं आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, टी-२० मध्ये मेंडिसचा स्ट्राइक रेट १३७.४३ आहे. अशा परिस्थितीत, बटलरच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मेंडिस गुजरातसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.





