Jos Buttler Record : जोस बटलरने रचला इतिहास! इंग्लंडसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसराच खेळाडू
Jos Buttler Record : जोस बटलर आपल्या कारकिर्दीतील २०० वा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला असून, इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात हा पराक्रम करणारा तो केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे.

Jos Buttler 200th ODI Match IND vs ENG Birmingham Edgbaston Eoin Morgan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याला बर्मिंघमच्या ऐतिहासिक एजबेस्टन मैदानावर सुरुवात झाली आहे. या हाय-व्होल्टेज लढतीत यजमान इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्याचा पहिला चेंडू पडण्यापूर्वीच इंग्लंडचा दिग्गज विकेटकीपर-फलंदाज जोस बटलरने इतिहास रचला आहे. जोस बटलर आपल्या कारकिर्दीतील २०० वा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला असून, इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात हा पराक्रम करणारा तो केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे.
१४ जुलैचा तो ‘चमत्कारिक’ योगायोग – (Jos Buttler Record)
जोस बटलरचा (Jos Buttler Record ) हा २०० वा एकदिवसीय सामना एका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक तारखेला आला आहे. आज, मंगळवार १४ जुलै रोजी बटलर हा सामना खेळत आहे. योगायोग असा की, आजपासून ठीक ७ वर्षांपूर्वी म्हणजेच १४ जुलै २०१९ रोजी इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर आपला पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट इतिहासातील तो सर्वात रोमांचक आणि वादग्रस्त फायनल सामना होता, जिथे सुपर ओव्हर देखील टाई झाल्यानंतर ‘बाउंड्री काउंट’ नियमाच्या आधारे इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून विश्वचषक उंचावला होता. बटलर स्वतः त्या ऐतिहासिक विश्वविजेत्या संघाचा मुख्य भाग होता.
इयोन मोर्गनंतर बटलरचाच नंबर – (Jos Buttler Record)
Jos Buttler is playing his 200th ODI today.
He is England’s third highest run-scorer in ODIs with 5515 runs.#engvsindpic.twitter.com/3hjbTKbPqk
— This Day That Year: Cricket Edition (@cricket_TDTY) July 14, 2026
इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ माजी कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) यालाच २०० हून अधिक वनडे सामने खेळण्याचा मान मिळाला होता. मोर्गनने इंग्लंडसाठी सर्वाधिक २२५ वनडे सामने खेळले आहेत. आता भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच बटलरने या जादुई आकड्याला स्पर्श केला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर माजी ऑलराउंडर पॉल कॉलिंगवूड (१९७ सामने) आहे. (Jos Buttler Record)
१४ वर्षांचा बेमिसाल प्रवास! (Jos Buttler Record)
जोस बटलरने २१ फेब्रुवारी २०१२ रोजी पाकिस्तानविरुद्ध दुबईत वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण (Debut) केले होते. आपल्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बटलरने इंग्लंडला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील जगातील सर्वात आक्रमक टीम बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या त्याच कोर टीमवर विश्वास दाखवला आहे, ज्या संघाने नुकतीच भारताविरुद्ध टी-२० मालिका गाजवली होती. या ऐतिहासिक सामन्यात एमएस धोनी देखील टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्याने सामन्याची रंगत आणखी वाढली आहे.





