Kunal Kamra : कुणाल कामराची नवीन पोस्ट चर्चेत..; काय म्हणाला एकदा पाहाच !

Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगात्मक गाणं गात टीका केली होती. त्यानंतर संतापलेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केला.
दरम्यान, कुणाल कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलीसांनी चौकशी केली आहे. दुस-या समन्सची मुदत संपत आली, तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही.
तर दुसरीकडे कुणाल कामरामुळं त्याचे प्रेक्षकही अडचणीत आले आहेत. ‘नया भारत’ शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांनी थेट समन्स बजावले आहे.
या प्रकरणी भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वाय.पी. सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या भुमिकेमुळं कामराच्या चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
दरम्यान, अशातच आता कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कुणालने त्याच्या पोस्टमध्ये पाच मुद्दे मांडले आहेत.
१) संताप अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की तो अनेक ब्रांड्सना काम करताना अडचण झाली पाहिजे.
२) त्यानंतर संताप आणि निषेधाचं प्रमाण आणखी वाढवायचं जेणेकरुन संस्थात्मक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहादा विचार करावा लागेल.
३) संतापाचं आणि निषेधाचं, आरडा ओरडा करण्याचं प्रमाण इतकं वाढवा की मोठी हॉटेल्स, स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घ्यायला नको.
४) संतापाला आता हिंसेचं रुप द्या, म्हणजे छोट्या-छोट्या जागा, स्टुडिओ हेदेखील दहशतीने त्यांची दारं बंद करतील.
५) स्टँड अप कॉमेडीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना समन्स धाडा, असं केल्याने कलाकाराचा मंच हा एखादा क्राईम सीन होऊन जाईल.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
हे सगळं केलं की कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे आपला ‘आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचं बाहुलं व्हायचं किंवा दुसरा पर्याय शांत बसायचं’. मी सांगतोय हे एखादं प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते. असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे.





