कुंभमेळ्याला जाण्यासाठी गर्दी अन् घडला अनर्थ; दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू

New Delhi Stampede Like Situation | नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची शनिवारी गर्दी झाली होती. यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर झालेल्या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय 10 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री (15 फेबुवारी) रात्री 8 वाजता प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गाड्या का लेट झाल्या आणि पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती की नाही? या संपूर्ण घटनेची चौकशी रेल्वे अधिकारी करत आहेत.
#WATCH | Huge crowd witnessed outside the New Delhi Railway Station.
As per Ministry of Railway, the situation is under control, and the injured have been taken to the hospital pic.twitter.com/WB5Smv1LTW
— ANI (@ANI) February 15, 2025
दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी केले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वर उभे होते, तेव्हा प्लेटफॉर्मवर बरीच गर्दी होती. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशीरा होते आणि या गाड्यांचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक 12,13 आणि 14 येथे उपस्थित होते. सीएमआयनुसार रेल्वेने दर तासाला 1500 सामान्य तिकिटे विकली, म्हणून गर्दी अनियंत्रित झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळ एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. New Delhi Stampede Like Situation |
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे, असे म्हंटले आहे.
Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2025
मुख्यमंत्री आतिशी काय म्हणाल्या?
दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आम्ही एलएनजेपी रुग्णालयात पोहोचलो आणि घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलो. अनेक लोक जखमीही झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आमचे दोन आमदार पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित आहेत, असं आतिशी म्हणाल्या.
महाकुंभात शनिवारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना
तर दुसरीकडे, महाकुंभात शनिवारी पुन्हा एकदा आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत अनेक तंबू जळाले आहेत. महाकुंभात २८ दिवसांत आगीची ही चौथी घटना आहे. ७ फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर-१८ मध्ये आग लागली. शंकराचार्य मार्गावर ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये २२ मंडप जळाले. १९ जानेवारी रोजी सेक्टर १९ मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली. या अपघातात १८० कॉटेज जळून खाक झाल्या होत्या.
हेही वाचा:
Pune District : जातेगाव बुद्रुकला चासकमानचे पाणी सोडा शेतकऱ्यांची मागणी ; भूजल पातळी खालावली





