Heinrich Klaasen Angry : फॅनची हुज्जत अन् क्लासेनचा चढला पारा; ‘त्या’ चाहत्याला दिली थेट धमकी! नेमकं कारण काय? पाहा VIDEO
Heinrich Klaasen Angry : हेनरिक क्लासेन विमानतळावरून जात असताना एक चाहता त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता, ज्यावर क्लासेन संतापला.

Heinrich Klaasen Warns Fan Video Viral : सनराइजर्स हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेन सध्या आयपीएल २०२६ मध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे चर्चेत आहे. मात्र, या मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्लासेन एका विमानतळावर एका चाहत्याला त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा व्हिडीओ न बनवण्याची सक्त ताकीद देताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, हेनरिक क्लासेन विमानतळावरून जात असताना एक चाहता त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. क्लासेन सहसा आपल्या वैयक्तिक आयुष्याला आणि कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूर ठेवणे पसंत करतो. सुरुवातीला त्याने नम्रपणे त्या चाहत्याला फोटो आणि व्हिडीओ न काढण्याची विनंती केली. मात्र, चाहत्याने ती गोष्ट न ऐकता व्हिडिओ सुरूच ठेवला.
One guy was recording Klaasen despite him saying no then he went to him and said
“Don’t do it, If I turn around and see you clicking me and my family, I promise you’ll be on the floor next moment”
Why can’t they give them privacy at least when they’re with family🤷🏼♂️ pic.twitter.com/WL8oid0xqv
— Neil🔪 (@PsychDominant) April 30, 2026
त्यानंतर क्लासेनचा संयम सुटला आणि त्याने रागाच्या भरात चाहत्याला चेतावणी दिली की, “जर मी परत वळलो आणि तू माझ्या किंवा माझ्या कुटुंबाचा फोटो काढताना दिसला, तर पुढच्या क्षणी तू जमिनीवर असशील.” क्लासेनने अत्यंत आक्रमकपणे कॅमेरा दूर ठेवण्यास सांगितले. जरी या व्हिडिओ आणि आवाजाची अधिकृत पुष्टी झाली नसली, तरी सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
क्लासेनची आयपीएलमधील कामगिरी –
मैदानावर मात्र क्लासेनची कामगिरी अत्यंत शानदार राहिली आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याने ९ सामन्यांत ४१४ धावा केल्या आहेत. सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याच संघाचा साथीदार अभिषेक शर्मा ४२५ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाने नुकताच मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून या हंगामातील सहावा विजय नोंदवला आहे.





