Vaibhav Sangakkara Stories : वैभवने १३ षटकार मारण्याचा दिला होता शब्द, अन् तब्बल इतके मारले; कुमार संगकाराने सांगितला भन्नाट किस्सा
Vaibhav Sangakkara Stories : श्रीलंकेचे माजी दिग्गज कुमार संगकारा यांनी वैभवच्या अफाट आत्मविश्वासाचे काही रंजक आणि न ऐकलेले किस्से शेअर केले आहेत.

Vaibhav Sooryavanshi Kumar Sangakkara IPL 2026 Jofra Archer : भारतीय क्रिकेटचा नवा उगवता तारा आणि अवघ्या १५ वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रीडा जगतात कमालीचा चर्चेत आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, राजस्थान रॉयल्सचे हेड कोच आणि श्रीलंकेचे माजी दिग्गज कुमार संगकारा यांनी वैभवच्या अफाट आत्मविश्वासाचे काही रंजक आणि न ऐकलेले किस्से शेअर केले आहेत. ‘स्काय स्पोर्ट्स’च्या एका शो दरम्यान संगकारा यांनी वैभवने आयपीएल २०२६ मध्ये दाखवलेल्या अद्भूत धाडसाचे तोंडभरून कौतुक केले.
२२० धावांचे आव्हान अन् कोचला मारला डोळा –
आयपीएलमधील एका सामन्याचा थरारक किस्सा सांगताना संगकारा म्हणाले, “लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सला २२० धावांचे मोठे आव्हान मिळाले होते. पहिल्या डावानंतर अवघा १५ वर्षांचा वैभव माझ्याकडे आला, त्याने मला चक्क डोळा मारला आणि अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला, ‘कोच, काळजी करू नका. हे काम होऊन जाईल.’
🚨BIG REVEALATION BY KUMAR SANGAKKARA ON THE CONFIDENCE OF VAIBHAV SOORYAVANSHI. 🚨
Kumar Sangakara said 🗣️:
“When we were chasing 220 Vs LSG this year, Vaibhav walked out and winked at me and says, ‘Coach, don’t worry. It’s done’. He tells Donovan Ferreira and Lhuan-dre… pic.twitter.com/KqbijK0tcP
— Indian Cricket (@IPL2025Auction) June 27, 2026
त्यानंतर तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि तिथे असलेल्या डोनोवन फरेरा आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस या परदेशी खेळाडूंना म्हणाला, ‘ऐका, मी या मॅचमध्ये १३ षटकार मारणार आहे, त्यानंतर उरलेले काम तुम्ही सांभाळा.’ या सामन्यात वैभवने खरंच १० गगनचुंबी षटकार ठोकत अवघ्या ९३ धावा कुटल्या आणि राजस्थानला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.”
गुवाहाटी कॅम्पमध्ये जोफ्रा आर्चरला फोडले –
Kumar Sangakkara recalls “𝗧𝗵𝗶𝘀 𝘆𝗲𝗮𝗿, 𝘄𝗲 𝘄𝗲𝗿𝗲 𝗽𝗹𝗮𝘆𝗶𝗻𝗴 𝗟𝗦𝗚. 𝗪𝗲 𝗵𝗮𝗱 𝘁𝗼 𝗰𝗵𝗮𝘀𝗲 𝟮𝟮𝟬. 𝗩𝗮𝗶𝗯𝗵𝗮𝘃 𝗦𝗼𝗼𝗿𝘆𝗮𝘃𝗮𝗻𝘀𝗵𝗶 𝗶𝘀 𝘄𝗮𝗹𝗸𝗶𝗻𝗴 𝗼𝘂𝘁, 𝗵𝗲 𝘄𝗶𝗻𝗸𝘀 𝗮𝘁 𝗺𝗲 𝗮𝗻𝗱 𝘀𝗮𝘆𝘀, ‘𝗖𝗼𝗮𝗰𝗵, 𝗱𝗼𝗻’𝘁 𝘄𝗼𝗿𝗿𝘆. 𝗜𝘁’𝘀… pic.twitter.com/Oj8cPgvQIv
— InsideSport (@InsideSportIND) June 27, 2026
कुमारा संगकारा यांनी गुवाहाटी येथील राजस्थान रॉयल्सच्या सराव शिबिरातील आणखी एक किस्सा सांगितला. तिथे एका लहान नेटमध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा नवीन चेंडूने घातक गोलंदाजी करत होते. त्याच्या वेगामुळे कोणताही मोठा फलंदाज समोर जाण्यास तयार नव्हता. अशा वेळी वैभव स्वतःहून पुढे आला आणि त्याने आर्चरच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. वैभव इतक्या सहजतेने खेळत होता की, अखेर जोफ्रा आर्चरलाही हसू आवरले नाही.
२८ जूनला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची शक्यता –
🏏 Recalling the contest between Rajasthan Royals and Lucknow Super Giants last season, Kumar Sangakkara revealed the confidence Vaibhav Sooryavanshi carries.
📸: Nagara Gopal pic.twitter.com/2iXZPTB3u5
— Sportstar (@sportstarweb) June 27, 2026
आयर्लंडविरुद्ध २६ जून रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात वैभवला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळाली नव्हती; मात्र, रविवार, २८ जून रोजी संध्याकाळी ६:०० वाजता होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीचे सीनियर आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण होण्याची दाट शक्यता आहे.





