Pune District : 100 टक्के वसुलीबद्दल मोई सोसायटीचा गौरव

चिंबळी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांना दिलेल्या पीक कर्जाचे 100 टक्के वसुली केल्याबद्दल मोई (ता. खेड) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मोई संस्थेचे माजी अध्यक्ष समीर रामदास गवारे, मारुती एकनाथ येळवंडे व सचिव निलेश श्रीराम देशमुख यांना महाळुंगे इंगळे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक व बक्षीस देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, माजी सभापती विलास कातोरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी अध्यक्ष आनंद गवारे, माजी उपसरपंच देवीदास मेदनकर, सचिन येळवंडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर गवारी यांचासह सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते.





