kriti kharbanda : पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत! लक्षवेधक कॅप्शन, ग्लॅमरस फोटोमुळे चाहते घायाळ
kriti kharbanda : कृतिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एम्ब्रॉयडरी आणि स्टोनवर्क असलेल्या आकर्षक टू-पीस आउटफिटमध्ये दिसत आहे.

kriti kharbanda : बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा (kriti kharbanda ) पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे. कृतिने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले असून, तिच्या फोटोंइतकंच तिचं भन्नाट कॅप्शनही नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे.
सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि चर्चेचा विषय ठरत आहेत. याला कारणही तसंच आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी अखेरच्या दिवशी म्हणजेच २० मे दिवशी इटलीच्या पंतप्रधान जॅार्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ( kriti kharbanda)
या व्हिडीओमध्ये मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘मेलोडी’ टॉफी भेट देताना दिसले. त्यानंतर सोशल मीडियावर ‘मेलोडी’ ट्रेंड सुरू झाला असून, या ट्रेंडमध्ये आता कृतिनेही मजेशीर अंदाजात सहभाग घेतला आहे.
कृतिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एम्ब्रॉयडरी आणि स्टोनवर्क असलेल्या आकर्षक टू-पीस आउटफिटमध्ये दिसत आहे. स्ट्रॅपलेस टॉप आणि मॅचिंग स्कर्टमधील तिचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ( kriti kharbanda )
View this post on Instagram
आउटफिटवरील हेवी डिटेलिंगमुळे तिचा संपूर्ण लुक अधिकच प्रीमियम दिसत आहे. मेकअपसाठी कृतिने ग्लोइंग आणि डेवी फिनिश लूक निवडला आहे. हलक्या बेसमुळे तिची त्वचा फ्रेश आणि नैसर्गिक दिसत आहे. ( kriti kharbanda )
तसेच स्टेटमेंट आउटफिटला साजेशी मिनिमल ज्वेलरी कॅरी करत तिने हलके इयररिंग्स परिधान केले आहेत. सोफ्यावर बसून दिलेल्या तिच्या स्टनिंग पोझेस चाहत्यांना अक्षरशः घायाळ करत आहेत.
या लूकची चर्चा अधिक होत आहे, याचं कारण म्हणजे कृतीन दिलेले कॅप्शन. या फोटोंना कृतिने “ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है” असं हटके कॅप्शन दिलं आहे. तिने दिलेल्या या हटके कॅप्शनमुळे पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा : Cockroach Janata Party : “व्यवस्थेच्या चुकीची किंमत विद्यार्थ्यांनी का मोजावी?” ; कॉकरोच जनता पार्टीचा संताप





