Cockroach Janata Party : “व्यवस्थेच्या चुकीची किंमत विद्यार्थ्यांनी का मोजावी?” ; कॉकरोच जनता पार्टीचा संताप
Cockroach Janata Party : मागच्या काही दिवसापासून देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच पार्टीने आता सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

Cockroach Janata Party : मागच्या काही दिवसापासून देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच पार्टीने आता सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. कारण सरकारच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतायंत. मात्र तरीही सरकारमधील मंत्री राजीनामे द्यायला तयार नाही, अशी सडकून टीका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी शिक्षण मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. ९४ लाख लोकांचं मत आहे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
दुसऱ्यांचे प्राण वाचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याला स्वतःचा जीव द्यावा लागला, यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी काय असू शकते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला
देशातील आणि राज्यातील नीट पेपरफुटी प्रकरणे तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या यांवरून ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सरकारच्या गैरकारभारामुळे देशातील तरुण आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, तरीही सरकारमधील मंत्री राजीनामा द्यायला तयार नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
९४ लाख लोकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम (Cockroach Janata Party )
अभिजीत दिपके यांनी याविषयी बोलताना, आज आमच्याकडे ९४ लाख लोक जोडलेले आहेत. आम्ही या सर्व ९४ लाख लोकांना एक फॉर्म पाठवणार आहोत. जेव्हा हे सर्व लोक स्वाक्षरी करून तो फॉर्म आम्हाला परत पाठवतील, तेव्हा आम्ही अधिकृतपणे मांडू की या ९४ लाख जनतेची अशी मागणी आहे की शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.” असे म्हटले आहे.
नीट परीक्षेतील गोंधळ आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती संदर्भातील मुद्द्यांवर बोलताना अभिजित यांनी, “विद्यार्थ्यांच्या आत्महत्या तर दूरच, पण जेव्हा ‘नीट’चा पेपर लीक झाला, तेव्हाच शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा यायला हवा होता. महाराष्ट्रातही पोलीस भरतीचे कितीतरी पेपर लीक झाले आहेत. तुम्ही थेट विद्यार्थ्यांच्या करिअरशी आणि त्यांच्या आयुष्याशी खेळत आहात.” असा घणाघात त्यांनी केला.
व्यवस्थेच्या चुकीची किंमत विद्यार्थ्यांनी का मोजावी? (Cockroach Janata Party )
पुढे बोलताना अभिजित यांनी,”सरकारच्या चुकीमुळे आणि गैरकारभारामुळे देशातील मुलं जीव देत आहेत. लोकांचे जीव जात असतानाही तुम्ही खुर्चीला चिकटून बसला आहात. या देशात माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? चूक व्यवस्थेची आणि सरकारची आहे, पण त्याची शिक्षा आणि किंमत मात्र विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे, हा कसला न्याय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.





