Krishnamachari Srikkanth on Harshit Rana : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा केली आहे. या दौऱ्यात १९ ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिका आणि २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश आहे. मात्र, त्याच्या निवडीवर भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी तीव्र टीका केली आहे. हर्षित राणा सध्या भारतीय संघात असा खेळाडू आहे, जो जवळपास तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्थान मिळवत आहे. अलीकडेच त्याने यूएई येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही सहभाग घेतला होता. मात्र, त्याची कामगिरी विशेष प्रभावी ठरलेली नाही. तरीही त्याला सातत्याने भारतीय संघात संधी मिळत आहे. यावर श्रीकांत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. श्रीकांत यांचे वादग्रस्त वक्तव्य – आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, “संघात एकच कायमस्वरूपी खेळाडू आहे, तो म्हणजे हर्षित राणा. तो संघात का आहे, हे कोणालाच माहीत नाही. काही खेळाडू चांगली कामगिरी करूनही निवडले जात नाहीत, तर काही खराब कामगिरी करूनही निवडले जातात. सर्वात सोपा मार्ग म्हणजे हर्षित राणासारखे व्हा, गौतम गंभीरच्या ‘हो’ला हो म्हणा आणि संघात जागा मिळवा जा.” हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहली जपानकडून खेळणार? जपानी संघाच्या अधिकृत पोस्टमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ, फोटो होतोय व्हायरल श्रीकांत यांनी हर्षित आणि भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांवरही बोट ठेवले. २०२४ मध्ये गंभीर कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाचा मार्गदर्शक होता, तेव्हा हर्षितही केकेआरकडून खेळत होता. त्यानंतर या दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाल्याचे मानले जाते. हेही वाचा – Irani Cup 2025 : विदर्भाने इराणी करंडकावर तिसऱ्यांदा कोरलं नाव! रेस्ट ऑफ इंडियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा हर्षित राणाची कामगिरी आणि संधी – हर्षित राणाने भारतासाठी आतापर्यंत २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४, एकदिवसीय सामन्यांत १० आणि टी-२० मध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, टी-२० मधील त्याचा इकॉनॉमी रेट १०.१८ इतका आहे, जो त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशात हर्षितच्या सातत्यपूर्ण निवडीमुळे निवड समितीच्या निर्णयावर चर्चा सुरू झाली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या दोन्ही संघात हर्षित राणाच्या नावाचा समावेश आहे.