Pune District : ‘कृष्ण जन्मला ग संखे… कृष्ण जन्मला…’ फुलांची उधळण करत कृष्ण जन्मोत्सव साजरा
Pune District : सजवलेल्या पाळण्यात बाळकृष्णाच्या रूपातील श्रीफळ ठेवून अस्मिता जोशी, मनीषा शेटे, मंजुषा वैशंपायन, मंगल दाते, प्राजक्ता बेडेकर, जयश्री गोडबोले व विजया पाटणकर यांनी पारंपरिक पाळणा गीते गायली.

परिंचे : परिंचे (ता. पुरंदर) येथील प्राचीन विष्णू मंदिरात मध्यरात्री साडेबारा वाजता फुलांची उधळण करत आणि पारंपरिक पाळण्याचे गायन करत गोकुळाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाविकांच्या वतीने विष्णू मंदिरात महाअभिषेक, श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि विष्णुसहस्रनाम पठण करण्यात आले. तसेच महादेव मंदिरात रुद्राभिषेक पार पडल्याची माहिती दीपक गोडबोले यांनी दिली.
गोकुळाष्टमीनिमित्त सकाळी १० वाजता अजय गोडबोले व दिनेश पटवर्धन यांच्या हस्ते उत्सवमूर्तींना अभिषेक करून महापूजा करण्यात आली. रात्री ८ वाजता रवींद्र महाराज मांडे यांचे ‘कृष्णलीला व कृष्ण जन्म’ या विषयावर कीर्तन झाले. मध्यरात्री साडेबारा वाजता दिगंबर गुरव यांनी तुतारी वाजवून सोहळ्यास प्रारंभ केला, तर भाविकांनी फुलांची उधळण करत कृष्णजन्मकाळ साजरा केला.
सजवलेल्या पाळण्यात बाळकृष्णाच्या रूपातील श्रीफळ ठेवून अस्मिता जोशी, मनीषा शेटे, मंजुषा वैशंपायन, मंगल दाते, प्राजक्ता बेडेकर, जयश्री गोडबोले व विजया पाटणकर यांनी पारंपरिक पाळणा गीते गायली.
पहाटे १ वाजता गावातील पाटील विक्रमसिंह जाधव यांनी सपत्नीक महाआरती केली. त्यानंतर उपस्थितांना सुंठवड्याचा महाप्रसाद वाटण्यात आला. या वेळी माहूर (ता. पुरंदर) येथील ‘श्रीनाथ भजनी मंडळा’चा सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम पार पडला. उत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने परिसर स्वच्छता व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी ज्योती जाधव, सुप्रिया जाधव, छाया कदम, विद्या गुरव उपस्थित होत्या. कृष्ण जन्माष्टमी सोहळा पार पाडण्यासाठी संजय जाधव, विजय जाधव, अमित जाधव, अनंदा कुदळे, तानाजी जाधव, गणेश जाधव, अमोल जाधव, गणेश कुंभार, श्रीपाद गुरव, बाळासाहेब जाधव, हनुमंत सोळसकर, चंद्रकांत जाधव, कांता गोंधळ आदी भाविक उपस्थित होते.





