Karad: कृष्णा कारखान्यासाठी ‘सहकार-संस्थापक’मध्ये लढत, 44 उमेदवार रिंगणात, आज होणार चिन्हवाटप
Karad अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी एकूण 139 उमेदवारी अर्ज दाखल होते. छाननीनंतर 122 अर्ज उरले होते.

Karad: बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी, मंगळवारी 53 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 44 उमेदवार रिंगणात राहिले असून, त्यामुळे सहकार आणि संस्थापक या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या, दि. 10 रोजी सकाळी चिन्हवाटप झाल्यानंतर पॅनेलच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती अपर्णा यादव यांनी दिली.
अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी एकूण 139 उमेदवारी अर्ज दाखल होते. छाननीनंतर 122 अर्ज उरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, मंगळवारी उरलेल्या 96 पैकी 53 जणांनी माघार घेतल्याने, 44 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दोन्ही पॅनेलनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे उमेदवार – सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. एक : वडगाव हवेली-दुशेरे : धोंडीराम जाधव (दुशेरे), जगदीश जगताप (वडगाव हवेली), आनंदा खबाले (विंग). सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. दोन : कार्वे-काले : अरविंद पाटील (आटके), दयाराम पाटील (काले), बाजीराव थोरात (कार्वे), सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. तीन : तांबवे-नेर्ले : दत्तात्रय देसाई (वाठार), लिंबाजी पाटील (तांबवे), संभाजीराव पाटील (नेर्ले), सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. 4 : बोरगाव-रेठरे हरणाक्ष, जयवंत मोरे (रेठरे हरणाक्ष) : सत्यजित पाटील (बोरगाव), सुनील पाटील (कामेरी), सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. 5 : येडेमच्छिंद्र-वांगी : संग्राम पाटील (येडेमच्छिंद्र), बाबासाहेब शिंदे (देवराष्ट्रे), सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. 6 : रेठरे बुद्रुक-शेणोली : सुरेश भोसले (रेठरे बुद्रुक), बाजीराव निकम (शेरे), महिला राखीव ः सुजाता जाधव (कापिल), सुनीता शेवाळे (सवादे), अनुसूचित जातीजमाती राखीव : छबन कांबळे (कोळे), भटक्या विमुक्त जाती जमाती/विशेष राखीव : अविनाश खरात (खरातवाडी), इतर मागास प्रवर्ग राखीव : बाळासाहेब जगताप (कोडोली)
कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलचे उमेदवार – गट नं. एक – आनंदा जगताप, प्रताप जगताप, दुर्योधन खबाले, गट नं. दोन – संतोष थोरात, प्रतापराव पाटील, शांताराम पाटील, गट नं. तीन – सुरेश पाटील, सुभाष पाटील, सुभाष पाटील, किरण पाटील, गट नं. चार – जयकर शिंदे, महेश पवार, महेश पाटील, उदयसिंह शिंदे, गट नं. पाच – माणिकराव मोरे, सुरेश पाटील, गट नं. 6 – अविनाश मोहिते, दीपक कणसे, महिला राखीव – अर्चना मोहिते, विजया पाटील, अनुसूचित जातीजमाती राखीव – सुधीर रोकडे, इतर मागास प्रवर्ग – प्रकाश श्रीखंडे, भटक्या विमुक्त जातीजमाती/विशेष राखीव – दिलीप तुकाराम गलांडे.





