Koyna Dam: कोयना धरणातून आणखी २०००० क्युसेक्स जलविसर्ग सोडणार; नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

Koyna Dam : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला असून, अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज दि. २५ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. कोयना धरणामध्ये एकूण ७८.२९ टीएमसी ७४.३८ % पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून १०००० विसर्ग चालू आहे.
तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी. आज संध्याकाळी ७:०० वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून २०००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.
तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल. धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग २१०५० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.





