Koregaon News : कोरेगाव तालुक्यातील आठवडा व जनावरे बाजार आज राहणार बंद
Koregaon News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील सर्व आठवडा बाजार व जनावरे बाजार बंद ठेवण्याचे आदेश.

Koregaon News – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी कोरेगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रात भरणारे सर्व आठवडा बाजार तसेच कोरेगाव येथील जनावरे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
दि मार्केट अँड फेअर अॅक्ट १८६२ अन्वये तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संगमेश कोडे यांनी हा आदेश जारी केला असून, मतदान प्रक्रियेवर बाजारांचा परिणाम होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व बाजारातील सर्व घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायत प्रशासनाने या आदेशाच्या अंमलबजावणीस सहकार्य करावे व बाजार बंद असल्याबाबत जाहीर प्रसिद्धी द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतदानादिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशीही तालुक्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत.या निर्णयाची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी, असे आवाहन कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी केले आहे.





