Koregaon Bhima : पुराच्या पाण्यात वाहून गेलेले महादेव राऊत तब्बल दीड तासांनी सुखरूप; प्रशासन, एनडीआरएफच्या शोधमोहीमेला यश
Koregaon Bhima : पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे भीमा नदीच्या पात्रात आलेल्या महापुरात एक अत्यंत थरारक घटना घडली.

Koregaon Bhima : वढू बुद्रुक येथील भिमा नदीपात्रात पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकलेले महादेव राऊत हे तब्बल दीड तासांच्या थरारक शोधमोहीमेनंतर सुखरूप आढळून आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. महादेव राऊत यांनी धाडसाने पाण्यात उडी घेत कंपनी परिसरालगत नदीचा किनारा गाठत स्वतःचा जीव वाचविल्याने मोठा अनर्थ टळला. (Koregaon Bhima)
महादेव राऊत हे पाण्याच्या टाकीजवळ असताना अचानक नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच महसूल, शिक्रापूर पोलीस, वढू बुद्रुक ग्रामस्थ आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. (Koregaon Bhima)
सुरुवातीला जेसीबीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने जेसीबीच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण झाला. (Koregaon Bhima)
परिस्थिती गंभीर होत असल्याने महादेव राऊत यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पुराच्या वेगवान प्रवाहामुळे ते वाहून जाऊन काही वेळातच नजरेआड झाले. त्यानंतर महसूल विभाग, पोलीस, एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. नदीपात्रात ड्रोनच्या सहाय्यानेही शोध घेण्यात आला. बराच वेळ त्यांचा मागमूस न लागल्याने घटनास्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. (Koregaon Bhima)
अखेर सुमारे दीड तासांनंतर महादेव राऊत हे महादेव कंपनी परिसराच्या बाजूने नदीचा किनारा गाठताना दिसून आले. त्यांना सुखरूप पाहताच उपस्थित ग्रामस्थ, प्रशासन आणि बचाव पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला. ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. (Koregaon Bhima)
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे नायब तहसीलदार स्नेहल गिरीगोसावी, मंडळ अधिकारी गुलफाम शेख, तलाठी रमेश घोडे, शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार हेमंत कुंजीर, संदीप कारंडे, वढू बुद्रुक चे प्रशासक सरपंच कृष्णा अरगडे, माजी सरपंच अनिल शिवले, माऊली भंडारे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे तसेच एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव व शोधकार्यामध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (Koregaon Bhima)
जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात शोधमोहिम
महादेव राऊत हे नदी पात्रात अडकल्याचे समजताच पोलीस हवालदार हेमंत कुंजीर, पोलीस पाटील जयसिंग भंडारे व सर्पमित्र शेरखान शेख यांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात शोधमोहिम राबवली. (Koregaon Bhima)
पात्रात एका उसाच्या शेतात राऊत यांना पहिल्याचे जाणवल्याने कुंजीर यांना तत्परता दाखवत ड्रोन च्या सहाय्याने राऊत यांना शोधत पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढल्याने कुंजीर यांसह पोलिस पाटील भंडारे व सर्पमित्र शेरखान शेख यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Koregaon Bhima)






