Korea Masters 2024 (Badminton) : भारतीय शटलर ‘किरण जॉर्ज’चा विजयी धडका कायम…

Korea Masters 2024 (Iksan City,Korea) : भारताच्या किरण जॉर्जने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत शुक्रवारी येथे पाचव्या मानांकित जपानच्या ताकुमा ओबायाशीचा (K. George vs T. Obayashi) सरळ गेममध्ये पराभव करून कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
जागतिक क्रमवारीत 41व्या स्थानावर असलेल्या 24 वर्षीय भारतीय खेळाडूने (Kiran George) बीडब्ल्यूएफ (BWF) वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 34व्या क्रमांकावर असलेल्या ओबायाशी याचा 21-14, 21-16 असा अवघ्या 39 मिनिटांत पराभव करून आणखी एक उलटफेर करत सामना जिंकला.
Kiran George storms into the Semifinals 🔥
Kiran defeated Takuma Obayashi 🇮🇳 in Quarterfinals with straight sets 21-14, 21-16#KoreaMasters2024 pic.twitter.com/mECeectinH
— The Khel India (@TheKhelIndia) November 8, 2024
शनिवारी उपांत्य फेरीत (वेळ : सकाळी 8:10 AM) जॉर्जचा सामना थायलंडच्या अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या कुनलावुत विटीडसार्नशी (K. George vs K. Vitidsarn) होईल, ज्याने चीनच्या लियू लियांगविरुद्ध 21-15, 21-11 असा विजय नोंदवत आगेकूच केली आहे.
भारतीय खेळाडूने यापूर्वी प्री-क्वार्टर फायनलमध्ये चायनीज तैपेईच्या तिसऱ्या मानांकित ची यू जेनचा पराभव केला होता. या स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव भारतीय शटलर किरण जॉर्ज (Kiran George) याने संपूर्ण सामन्यात चांगला खेळ केला. पहिल्या गेममध्ये त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली.
Korea Masters 2024 (Badminton) : भारताच्या किरण जॉर्जची उपांत्यपूर्व फेरीत धडक….
पहिल्या गेममध्ये जॉर्जने 15-6 अशी आघाडी घेतली असताना ओबायाशीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि स्कोर 12-16 असा केला पण भारतीय खेळाडूने सलग चार गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसरा गेम अगदी चुरशीचा होता आणि दोन्ही खेळाडूंनी एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे केले. जॉर्ज सुरुवातीला 7-3 ने पुढे होता पण ओबायाशीने पुनरागमन करत स्कोअर 8-8 केला. यानंतर लढत अतितटीची झाली. मात्र अखेरच्या क्षणांमध्ये भारतीय खेळाडूने पुन्हा वर्चस्व गाजवले. त्याने 17-16 अशा स्कोरपासून सलग चार गुण घेत दुसरा गेम आणि सामना जिंकला.





