Kolkata doctors strike – कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये ऑगस्टमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करणारे ज्युनियर डॉक्टर आता आमरण उपोषण करत आहेत आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांनी पुन्हा संघर्ष सुरू केला आहे. सहा लोक उपोषणाला बसले असून हे अनिश्चित काळासाठी म्हणजे आम्हाला न्याय मिळेपर्यंत सुरू राहील, असे त्यांनी काल रात्री सांगितले. दरम्यान, दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे म्हणजे एम्सचे सहकारी त्यांना पाठिंबा देत असून ते बुधवारी संध्याकाळी शहरातील जेएलएन सभागृहात मेणबत्ती पेटवून निषेध करणार आहेत. सोमवारी सकाळी एनडीटीव्हीशी बोलताना, एम्सच्या एका डॉक्टरने सांगितले की त्यांचे रुग्ण आणि जनतेप्रति कर्तव्य आहे आणि त्यामुळे ते अनिश्चित काळासाठी संप करू शकत नाहीत, परंतु देशाने बंगालच्या कनिष्ठ डॉक्टरांना 50 दिवस संप करताना पाहिले आहे. त्यांची मागणी पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे, ती म्हणजे न्याय. परंतु आम्ही ज्या पध्दतीने तपास सुरू आहे, त्यात तपासावर प्रश्नचिन्ह पाहत आहोत.तो खूप संथ आहे असे सांगतानाच त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर तीव्र टीका देखील केली. ममता बॅनर्जी ऐकत नाहीत. काही पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या फक्त विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राउंड रिॲलिटी बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाही. मग डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना कशी असेल?दरम्यान, दिल्लीतील या डॉक्टरांनी बंगालच्या डॉक्टरांच्या लाल झेंड्याच्या धमकी संस्कृतीवरही आक्षेप. ही धमकी संस्कृती संपण्याची वेळ आता आली आहे व ती संपली पाहिजे. फक्त कोलकात्यातच नाही तर भारतात कुठेही तसे व्हायला नको. तसेच ते त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मूक मोर्चा आणि मेणबत्ती पेटवून निषेध नोंदवतील असेही डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी असेही सूचित केले की बाकीचे लोक रुग्णांना भेटून त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतील परंतु काहीही खाणार नाहीत. त्यांच्या अवस्थेला राज्य जबाबदार राहील, असे ते म्हणाले.