Kolhapur : कोल्हापुरातून तब्बल ‘इतके’ किलो गांजा जप्त; ऊसाच्या शेतात लावली होती झाडे

Kolhapur : कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करताना ऊसाच्या शेतातून तब्बल १५ किलो गांजा जप्त केला आहे. करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी जाणाऱ्या रोडवर विठलाई परिसरातील ऊसाच्या शेतात एका इसमाने गांजाची काही झाडे लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पीआय रविंद्र कळमकर यांनी त्यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. पथकाने ऊस शेतीचा मालक जयदीप यशवंत शेळके (वय 42, रा. शेळकेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास ताब्यात घेतले.
ऊस शेतीमध्ये काही गांजाची झाडे मिळून आल्याने सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून एकूण 15 किलो वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयित आरोपी जयदीप शेळकेला ताब्यात घेत करवीर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहेत.





