Bike Mileage Tips: बाइक माइलेज कमी देत असल्यास फॉलो करा ‘या’ टिप्स, नक्कीच होईल फायदा

Bike Mileage Tips: सध्या अनेकजण वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. मात्र, आजही भारतातील बहुतांश नागरिकांकडे पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या गाड्या आहेत. अनेकांची तक्रार असते की त्यांची बाइक माइलेज देत नाही. तुमची गाडी देखील जास्त माइलेज देत नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
इंजिन मेंटेन ठेवा – कोणत्याही गाडीच्या कामगिरीवर इंजिनचा सर्वाधिक परिणाम होत असतो. गाडीच्या इंजिन व्यवस्थित असल्यास माइलेज देखील अधिक मिळते. यासाठी वेळोवेळी इंजिन ऑइल बदलायला हवे. तसेच, गाडीची सर्व्हिसिंग देखील करायला हवी. इंजिन ऑइल न बदलल्यामुळे गाडी जास्त माइलेज देत नाही.
टायर प्रेशरकडे द्या लक्ष – बाइकचे टायर प्रेशर व्यवस्थित असल्यास इंजिनवर देखील कमी प्रभाव पडतो. इंजिनवर कमी प्रभाव पडल्याने गाडी माइलेज देखील अधिक देते. त्यामुळे नेहमी टायरची तपासणी करावी.
नियमित स्पीडवर चालवा गाडी – बाइकचे माइलेज तुम्ही गाडी कशाप्रकारे चालवता यावर देखील अवलंबून असते. वारंवार ब्रेक दाबणे, अचानक स्पीड कमी-जास्त करणे यामुळे इंधन जास्त जळते. त्यामुळे बाइकला नियमित स्पीडवर चालवणे गरजेचे आहे.
नियमित करा सर्व्हिस – अनेकजण गाडीच्या सर्व्हिंगकडे दुर्लक्ष करतात. परंतु, गाडीची नियमितपणे व ठरलेल्या तारखेला सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. यामुळे बाइकचा परफॉर्मेंस सुधारतो व इंधनाचाही जास्त वापर होत नाही. स्पार्क प्लग आणि क्लच प्लेट देखील वेळोवेळी बदलावे.
गिअरकडे द्या लक्ष: बाइक चालवताना गिअरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अचानक हायस्पीडमध्ये असताना गिअरमध्ये बदल केल्यास गाडीचे नुकसान होऊ शकते. तसेच, यामुळे इंजिनवर देखील परिणाम होते. त्यामुळे गाडी चालवताना नियमांचे पालन करत विशेष खबरदारी घ्यावी. तुम्ही नियमितपणे गाडीची सर्व्हिसिंग केल्यास व गाडी सुरळीतपणे चालवल्यास नक्कीच माइलेज वाढेल.





