Devendra Fadnavis : पंतप्रधान मोदींचे आवाहन अन् मुख्यमंत्री फडणवीसांची थेट बुलेट स्वारी; विधानभवनात रॉयल एन्ट्री!
Devendra Fadnavis : व्हिआयपी एन्ट्री वगळून मुख्यमंत्र्यांची दुचाकीवरुन येण्याला पसंती

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत. महाराष्ट्रातही सर्व मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेवटवरुन विधानभवनात एन्ट्री केली. आलिशान गाड्यांचा ताफा, व्हिआयपी एन्ट्री वगळून मुख्यमंत्र्यांनी दुचाकीवरुन विधानभवनात येणे पसंत केले.
फडणवीस यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळेही दुचाकीवरुन मंत्रालयात दाखल झाले. मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत फडणवीसांच्या या बाईक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Devendra Fadnavis
गडकरींचा बसने, तर प्रताप जाधवांचा मेट्रोने प्रवास
फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पालखी महामार्गाची पाहणी स्वत: गडकरी बसने प्रवास करत करणार आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनीही मेट्रोने प्रवास केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी EV कारने प्रवास केला. त्यामुळे नेतेमंडळींकडून मोदींच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
परदेश दौरे रद्द
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहनही केले आहे. त्यानुसारफडणवीस यांनी मोठा निर्णय घेत सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास, कामासाठीचे परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. Devendra Fadnavis
हेही वाचा:






