OnePlus Smartphone Offer: 17 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय OnePlus चा 5G स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

OnePlus Nord CE4 Lite 5G Smartphone Details: कमी किंमतीत ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. तुम्ही अवघ्या 17 हजार रुपयांमध्ये वनप्लसचा 5जी स्मार्टफोन खरेदी करू शकता. सध्या ई-कॉमर्स साइट Amazon वर OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफरचा देखील यावर लाभ मिळेल.
OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स व याच्या फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनवरील ऑफर्स आणि डिस्काउंट
OnePlus Nord CE4 Lite 5G च्या 8जी रॅम आणि 128जीबी व्हेरिएंटची Amazon वर किंमत सध्या 17,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन जून 2024 मध्ये 19,999 रुपयात लाँच झाला होता. बँक ऑफरबद्दल सांगायचे तर ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. अशाप्रकारे लाँच किंमतीच्या तुलनेत 3 हजार रुपयांपर्यंत फोन स्वस्त मिळेल. याशिवाय, 16,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. मात्र, ही ऑफर तुम्ही जो फोन एक्सचेंज कराल, त्यावर अवलंबून आहे.
OnePlus Nord CE4 Lite 5G चे फीचर्स
OnePlus Nord CE4 Lite 5G मध्ये 6.67 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन 1080X 2400 पिक्सल, रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आणिआस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. वनप्लसचा हा फोन ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. हा अँड्राइड 14 वर आधारित OxygenOS 14 वर काम करतो.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर वनप्लसच्या या फोनमध्ये रियरला OIS सपोर्टसह येणारा 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळेल. तर सेल्फी व व्हीडिओ कॉलिंगसाठी EIS सपोर्ट 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5500 एमएएच बॅटरी दिली आहे. यात कनेक्टिव्ही पर्यायासह 5जी, वाय-फाय 5, जीपीएस, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळेल.





