Maruti Dzire 2024: महिन्याला फक्त 16 हजार रुपये भरा अन् घरी घेऊन जा मारुतीची सनरुफसह येणारी कार

Maruti Dzire 2024: मारुती सुझुकीने महिनाभरापूर्वीच आपली लोकप्रिय सेडान कार डिझायरला नवीन अवतारात लाँच केले आहे. नवीन मॉडेलमध्ये डिझाइनसह अनेक शानदार फीचर्स देण्यात देखील देण्यात आले आहेत. या कारची किंमत कमी व मायलेज जास्त असल्याने ग्राहकांकडून देखील विशेष पसंती मिळत आहे.
कारच्या बेस मॉडेलची सुरुवाती किंमत 6,79,001 रुपये आहे. तर ऑन रोड किंमत 7,64,275 रुपयांपर्यंत जाते. कारची किंमत 7 लाख रुपयांपर्यंत असली तरीही ईएमआयच्या मदतीने तुम्ही फक्त 50 हजार रुपये भरून गाडी घरी घेऊन जाऊ शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
दरमहिना भरा फक्त 16 हजार रुपये
तुम्ही सुरुवातीला केवळ 50 हजार रुपये भरून खरेदी करू शकता. उर्वरित साडे सहा लाख रुपयांचे बँकेकडून कर्ज घेता येईल. बँका 9.8 टक्के दराने कारवर कर्ज उपलब्ध करून देते. यानंतर तुम्हाला दरमहिन्याला 15,893 रुपये ईएमआय भरावा लागेल.
Maruti Dzire 2024 चे फीचर्स
नवीन मारुती डिझायरमध्ये कंपनीने 9 इंच टचस्क्रीन देण्यात आली असून, यात अँड्राइड ऑटो, अॅ पल कारप्ले सपोर्ट मिळेल. याशिवाय, ऑटो एसी, अॅतनालॉग ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, सिंगल पॅन सनरूफसह येणारी ही भारतातील पहिली सबकॉम्पॅक्ट सेडान कार आहे.
मारुतीच्या या कारमध्ये 1.2 लीटर 3 सिलेंडर झेड सीरिज पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 82 PS पॉवर आणि 112 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कार पेट्रोल इंजिनवर जवळपास 25.71 kmpl मायलेज देते. तर सीएनजीवर 33.73 किमी/किलोग्राम मायलेज मिळते.





