Sunil Shetty Birthday : केएल राहुलने सुनील शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, ‘आता थोडा जास्त…’

Sunil Shetty 64th Birthday with Wishes from KL Rahul: बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता सुनील शेट्टी आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. तीन दशकांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यानी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वाढदिवसानिमित्त त्याला चाहते, मित्र आणि कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात त्याचा जावई, भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलनीही खास शुभेच्छा दिल्या आहेत. राहुलने सुनील शेट्टीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे.
केएल राहुलने सुनील शेट्टीला दिल्या शुभेच्छा –
केएल राहुलने इन्स्टाग्रामवर सुनील शेट्टी आणि अहान शेट्टी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “जन्मदिनाच्या शुभेच्छा, अज्जा सुनील शेट्टी! तुमचे प्रत्येक कार्य आम्हाला प्रेरणा देते. आणि कृपया, थोडा जास्त आराम करा.” सुनील शेट्टची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे 2023 मध्ये खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर लग्न झाले होते. अथियानेही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. राहुल आणि अथियाला इवारा नावाची मुलगी आहे, जिचा जन्म 24 मार्च 2025 रोजी झाला.
33 वर्षीय केएल राहुलने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात प्रभावी कामगिरी केली. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने 10 डावांत 532 धावा केल्या. या मालिकेत तो तिसरा सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याच्या खात्यात दोन शतके आणि तीन अर्धशतके जमा झाली. भारताने लंडनच्या द ओव्हल मैदानावर झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात 6 धावांनी रोमांचक विजय मिळवत मालिका 2-2 ने बरोबरीत राखली.
#INDvsENGTest#INDvsENG#INDvsEND#ENGvsIND
Sunil Shetty the Sasurji of KL Rahul reaction after India won the #Oval match👇👇pic.twitter.com/CfeQ03lk12
— Khan (@Khanmohammed12) August 4, 2025
शेवटच्या सामन्यात सुनील शेट्टी स्टेडियममध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन देताना दिसला. इंग्लंडला शेवटच्या दिवशी 35 धावांची गरज होती, पण भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सामना फिरवला. सुनील शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनीही त्याच्या चित्रपट कारकीर्दीचे आणि फिटनेसचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.






