KKR vs PBKS सामन्याचा ‘कटऑफ टाईम’ काय? ५-५ षटकांच्या सामन्यासाठी किती वाजता सुरूवात होणे आवश्यक? जाणून घ्या
KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सुरू झाला, मात्र पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला आहे.

KKR vs PBKS Rain Update IPL 2026 : ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरची सुरुवात खराब झाली आणि ३.४ षटकांत २५ धावांवर त्यांचे दोन महत्त्वाचे गडी बाद झाले. ७:५१ वाजता पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे आणि घड्याळाकडे लागल्या आहेत.
काय आहे कट-ऑफ टाईम?
जर हा सामना पूर्ण २० षटकांचा खेळवायचा असेल, तर तो रात्री ८:३० पर्यंत पुन्हा सुरू होणे आवश्यक होता. मात्र ८:३० पर्यंत खेळ सुरू झाला नाही, त्यामुळे षटकांची कपात करण्यास सुरुवात झाली आहे. नियमानुसार, किमान ५-५ षटकांचा सामना होण्यासाठी रात्री १०:५६ ही शेवटची वेळ (Cut-off Time) निश्चित करण्यात आली आहे. जर या वेळेपर्यंतही खेळ सुरू होऊ शकला नाही, तर सामना रद्द करण्यात येईल. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस (Reserve Day) नसल्याने, सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण दिला जाईल.
KKR vs PBKS likely to be washed out ☔😞
Both teams get 1 point — PBKS goes ahead of RCB in the table!#KKRvsPBKS pic.twitter.com/pK5hpISG23— DingDong (@DingDongHQ) April 6, 2026
केकेआरच्या संघात मोठा बदल; चक्रवर्ती-नरेन बाहेर!
🚨 BREAKING: KKR vs PBKS Rain Update
– Rain has completely stopped the match
– Now the entire game will depend on time
– Important Timings:
– Until 9: 30 PM → Full 20-20 match possible
– After 10: 30 PM → Overs start being cut
– 11: 14 PM (Cricbuzz) Last chance for… pic.twitter.com/l6paCNXkWC
— Cricket Hindustan (@goldensports98) April 6, 2026
२०१९ नंतर पहिल्यांदाच केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनाही स्थान मिळालेले नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरची फिरकी गोलंदाजी यामुळे काहीशी कमकुवत भासत आहे. पंजाब किंग्सच्या ताफ्यात अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल सारख्या गोलंदाजांनी केकेआरला सुरुवातीलाच धक्के दिले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, नेहाल वढेरा, शशांक सिंi, मार्कस स्टोइनिस, मार्को यान्सन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स: फिन ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरन ग्रीन, अंगकृष रघुवंशी, रोवमन पॉवेल, रिंकू सिंह, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, नवदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी.





