KKR vs PBKS : ईडन गार्डन्सवर पावसाने मारली बाजी! पंजाब-कोलकाताला संघांना मिळाला प्रत्येकी १-१ पॉईंट
KKR vs PBKS : केकेआरसाठी हा पाऊस जणू 'वरदान' , तर पंजाबसाठी शाप ठरला.

KKR vs PBKS IPL 2026 Rain Abandoned : आयपीएल २०२६ च्या १२ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील ईडन गार्डन्सवरील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. केवळ ३.४ षटकांचा खेळ झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला, मात्र केकेआरसाठी हा पाऊस जणू ‘वरदान’ तर पंजाबसाठी शाप ठरला. कसा ते जाणून घेऊया.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने पंजाब किंग्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, आकाशात काळे ढग असताना आणि पावसाची शक्यता असताना प्रथम फलंदाजी निवडण्याचा रहाणेचा निर्णय अनेकांना बुचकळ्यात पाडणारा होता. केकेआरच्या डावाला सुरुवात होताच पंजाबच्या गोलंदाजांनी ओव्हरकास्ट कंडिशन्सचा पुरेपूर फायदा उठवला.
केकेआरची दैना अन् पावसाची एन्ट्री –
The game between KKR and PBKS has been Abandoned due to Wet Outfield ⛈️
Both teams Share 1 Point each as Punjab Tops the Table with 5 points 🔝- KKR open their account with 1 point ☝️
.
📷: JioStar
. #KKRVsPBKS #IPL2026 #AjinkyaRahane #ShreyasIyer #MatchAbandoned #PointShare… pic.twitter.com/bSvfbnqWnw— Cricket Gyan (@cricketgyann) April 6, 2026
पंजाबच्या झेव्हियर बार्टलेटने सुरुवातीलाच फिन ॲलन (६ धावा) आणि कॅमेरून ग्रीन (४ धावा) यांना स्वस्तात माघारी धाडून केकेआरची अवस्था २ बाद १६ अशी केली होती. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे (८*) आणि अंगकृष रघुवंशी (७*) डाव सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, ३.४ षटकांत २५ धावा धावफलकावर असताना पावसाने जोरदार हजेरी लावली. बराच वेळ वाट पाहूनही पाऊस थांबला नाही आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला.
पंजाबचा हिरमोड, केकेआरला जीवदान –
हा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. पंजाब किंग्स या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, त्यामुळे १ गुणावर समाधान मानावे लागल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, सलग दोन सामने हरलेल्या केकेआरसाठी हा पाऊस फायद्याचा ठरला. पंजाब ज्या लयीत होती, ते पाहता केकेआरचा पराभव जवळपास निश्चित मानला जात होता, मात्र पावसाने त्यांना संभाव्य पराभवातून वाचवले. या १ गुणासह केकेआरने चालू हंगामात आपले खाते उघडले आहे. पंजाब किंग्सच्या खात्यात आता ३ सामन्यांनंतर एकूण ३ गुण जमा झाले आहेत.





