KKR vs PBKS : यष्टीरक्षकाने स्टंप सोडून गोलंदाजालाच मारलाच चेंडू, नेमकं काय घडलं, पाहा VIDEO
KKR vs PBKS : पावसाच्या व्यत्ययापूर्वी पंजाबचा वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेटने आपल्या एकाच षटकात केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

KKR vs PBKS Prabhsimran Singh hit ball Xavier Bartlett: आयपीएल २०२६ च्या १२ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील लढतीत पावसाच्या व्यत्ययापूर्वी पंजाबच्या एका पठ्ठ्याने ईडन गार्डन्सवर वादळ निर्माण केले. पंजाबचा वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेटने आपल्या एकाच षटकात केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. मात्र, यादरम्यान त्याच्या बाबतीत एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पंजाब किंग्सचा निर्णय झेव्हियर बार्टलेटने पूर्णपणे सार्थ ठरवला. केकेआरच्या डावातील दुसऱ्याच षटकात बार्टलेटने आपल्या घातक स्विंग गोलंदाजीने कोलकात्याच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्याने या षटकात दोन अशा विकेट्स घेतल्या ज्याने केकेआरचा संपूर्ण टॉप ऑर्डर हादरून गेला.
मैदानावर मजेशीर प्रसंग अन् बार्टलेटची शिकार –
Errors, laughs & absolute scenes ft. Finn Allen, Prabhsimran Singh & Xavier Bartlett. 🤣😂#TATAIPL 2026 | #KKRvPBKS | LIVE NOW 👉 https://t.co/zWHR71jXpN pic.twitter.com/YTry0zZ4Lq
— Star Sports (@StarSportsIndia) April 6, 2026
बार्टलेटच्या या षटकात एक मजेशीर घटनाही घडली. दुसऱ्या चेंडूवर फिन ॲलन धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर पडला असता, यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंगने वेगाने थ्रो केला, जो थेट गोलंदाज बार्टलेटला लागला. सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही, मात्र या घटनेनंतर बार्टलेट अधिकच आक्रमक झाला. त्याने चौथ्या चेंडूवर फिन ॲलनला आपल्या जाळ्यात ओढले. आऊटस्विंग चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ॲलन यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बसला.
कॅमेरून ग्रीनही ठरला हतबल –
केकेआरची अडचण इथेच संपली नाही. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बार्टलेटने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला बाद केले. ग्रीनने एक चौकार मारून सुरुवात केली होती, पण बार्टलेटने त्याला आपल्या ‘ट्रॅप’मध्ये अडकवले. चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा प्रभसिमरनच्या हातात विसावला. केवळ एका षटकात दोन दिग्गज विदेशी खेळाडूंना बाद करून बार्टलेटने पंजाबला स्वप्नवत सुरुवात करून दिली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा केकेआरची अवस्था २ बाद २५ अशी होती.





