Auqib Nabi : सलग चार चेंडूंत ४ विकेट्स घेणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजावर दिल्लीने पाडला पैशांचा पाऊस

Auqib Nabi sold to DC 8.40 crore in IPL Auction 2026 : आयपीएल लिलावात अनेकदा आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या (अनकॅप्ड) खेळाडूंना मोठी मागणी असते. विशेष म्हणजे ते आश्चर्यकारक किमतीत विकले जातात. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीच्या बाबतीत घडला आहे. ३० लाख रुपये मूळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी अनेक फ्रँचायझींमध्ये चुरस पाहायला मिळाली, परंतु अखेरीस दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला विक्रमी किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले.
मोठी बोली लागण्याचे कारण –
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज असलेल्या औकिब नबीची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. लिलावात त्याचे नाव पुकारले जाताच, अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. विशेषत: दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली, कारण दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर त्याने चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे त्याने रणजी सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला ऑउट केल्यामुळे पण तो चर्चेत आला होता.
Auqib Dar is all set to feature in the #TATAIPL 👌
The all-rounder joins @DelhiCapitals for INR 8.4 Crore 👏👏#TATAIPLAuction pic.twitter.com/RQ1tK7W2RF
— IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
नबी नवीन चेंडूने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करतो. याशिवाय, दुलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोनच्या सामन्यात त्याने सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेण्याची अविश्वसनीय कामगिरी केली होती. याच मैदानावर, जम्मू-काश्मीर विरुद्ध दिल्ली सामन्यात त्याने ३५ धावा देऊन पाच बळी मिळवले होते. तो केवळ सुरुवातीलाच नाही, तर ‘डेथ ओव्हर्स’मध्येही अचूक यॉर्कर टाकून प्रभावी गोलंदाजी करतो.
बोलीची चुरस आणि दिल्लीची बाजी –
औकिब नबीसाठी ३० लाख रुपयांपासून बोली सुरू झाली. दिल्ली कॅपिटल्सने सर्वप्रथम बोली लावली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स (RR) संघाने मैदानात उडी घेतली आणि दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली. किंमत १ कोटी रुपयांवर पोहोचल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) संघानेही यात सहभाग घेतला. यानंतर सनरायझर्स हैदराबाद (SRH)संघही या शर्यतीत उतरला.
हेही वाचा – IPL Auction 2026 : मथीशा पथिरानाने रचला इतिहास! IPL इतिहासातील ठरला सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू
संघ येत-जात राहिले, पण दिल्ली कॅपिटल्सने औकिबला आपल्या संघात घेण्यासाठी दृढनिश्चय केला होता. बोलीचा आकडा वाढवत सनरायझर्स हैदराबादने ८ कोटी २० लाख रुपयांपर्यंत बोली लावली. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने लगेचच ८ कोटी ४० लाख रुपयांची मोठी बोली लावत एसआरएचला माघार घेण्यास भाग पाडले. हा त्याचा पहिलाच आयपीएल हंगाम असणार आहे. आता तो अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली संघासाठी खेळताना दिसेल, जिथे त्याने यापूर्वी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे.





