श्रावण मासानिमित्त दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन आयोजीत कीर्तन महोत्सव उत्साहात

वारजे – माणसाच्या मनातले होत नाही. देवालाच दिलीप वेडेपाटील यांच्याकडून ही किर्तनसेवा घडवून आणायची होती. त्यामुळे अनेक वर्षानंतर खडकवासल्यात हा किर्तनसोहळा पार पडतो. विशेषत: या सोहळ्यात पंचक्रोशीतलच नव्हे तर मतदारसंघातील सर्व किर्तनकार एकाचठिकाणी येणे, त्यांचा सन्मान होणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी व्यक्त केले.
दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन आयोजीत खडकवासला विधानसभा मतदारसंघात श्रावण मासाच्या शुभारंभ ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्स याठिकाणी चार दिवशीय किर्तन मोहोत्सव पार पडला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती. ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आणि ह. भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे किर्तन झाले.
वारकरी क्षेत्रातील अध्यात्मिक सांप्रदायिक काम करणाऱ्या ११ कीर्तनकारणांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवासाठी किर्तनकेसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. संदीप महाराज गोगावले यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी गोऱ्हेकर संस्था, नांदेडकर दिंडी, क्षत्रिय मराठा दिंडी, जर्शेश्वर पंचक्रोशी दिंडी, मुळशी तालुका दिंडी, मुठा खोरे वारकरी समिती, मुक्ताबाई बेलगावकर, बोराटे माऊली दिंडी, संतकृपा प्रासादिक दिंडी, बाळाराम महाराज कांबेकर दिंडी, वेल्हा तालुका दिंडी, भोर तालुका दिंडी, हरिबाबा दिंडी, शिवगंगा खोरे सर्व दिंडी कीर्तन साथ संगत दिली. मोहत्सवात दररोज भजन, हरिपाठ, किर्तन आणि महाप्रसाद होता. टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरी-नामाचा जयघोषात आज महोत्सवाचा समारोप झाला.





