Pimpri : चऱ्होली येथील कीर्तन महोत्सवाला भाविकांचा प्रतिसाद

भोसरी : चऱ्होली येथील द्वारका स्केअर मित्र मंडळाच्या वतीने सामाजिका कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक देवीदास तापकीर यांच्या मातोश्री कै. द्वारका तापकीर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रस्तदान शिबीर आणि श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाविकाकडून उदंड प्रतिसाद मिळाला.
७ ते १३ जुलै या कालावधीत झालेल्या या महोत्सवातील रविवारी डाॅ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पंडित अतुलशास्त्री भगरे यांनी श्रीमद भागवत कथा सादर केली. महोत्सवात सात दिवस भाविकांना अन्नदान करण्यात आले.
वस्ताद किसनराव लांडगे, माजी महापौर नितिन काळजे. संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रदीप तापकीर, पवना सहकारी बॅंकेचे संचालक बिपिन नाणेकर, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापुसाहेब ढेरे, पोलीस पाटील पंडित तापकीर, कुणाल तापकीर, विजय रसाळ, धनंजय तापकीर आदींनी महोत्सवाला भेट दिली. सूत्रसंचालन महेश तापकीर यांनी केले.





