‘आमच्या खासदारांनीही हात उचलला असता तर…’ ; धक्कबुक्की प्रकरणावर किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींना सवाल

Kiren Rijiju on Rahul Gandhi । संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसने भाजपचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी “संसद हे कुस्ती आणि स्मार्टनेस दाखवण्याचे व्यासपीठ नाही” असे त्यांनी म्हटले.
‘आमच्या खासदारांनी हात उचलला असता तर काय झाले असते?’ Kiren Rijiju on Rahul Gandhi ।
किरेन रिजिजू यांनी घडलेल्या प्रकराची निंदा करत “राहुल गांधींनी शारीरिक ताकद दाखवली. त्यांनी आमच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली. आमच्या खासदारांनीही त्यांच्यावर हात उचलला असता तर काय झाले असते? असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच. राहुल गांधींनी भाजपच्या दोन खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना खूप धक्काबुक्की केली. त्यात ते जबर जखमी झाले. तुम्ही (राहुल गांधी) इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकलात का?असेही त्यांनी यावेळी म्हटले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू पुढे म्हणाले, “खासदार आपापल्या मतांसाठी संसदेच्या परिसरात निदर्शने करत आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक दररोज निदर्शने करतात. आज एनडीएच्या खासदारांनी निषेध केला कारण काँग्रेस पक्षाने बाबासाहेब भीमरावांचा निषेध केला. “. स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत आंबेडकरांचा अपमान करणे आणि नंतर गृहमंत्री अमित शहा यांचे संसदेच्या आत आणि बाहेर व्हिडिओ कापून खोटे पसरवण्याची त्यांनी प्रक्रिया सुरू ठेवली आहे” अशी टीका देखील रिजिजू यांनी केली.
भाजप खासदारांनी दाखवला संयम Kiren Rijiju on Rahul Gandhi ।
केंद्रीय मंत्री म्हणाले, “कोणत्या कायद्याने राहुल गांधींना दुसऱ्या खासदाराला धक्काबुक्की करण्याचा आणि दुखावण्याचा अधिकार दिला आहे? जर प्रत्येकजण आपली ताकद दाखवू लागला आणि भांडू लागला, तर संसदेचे कामकाज कसे चालेल? ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. आम्ही खासदारांना धक्काबुक्की करून संयम दाखवला आहे, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे.
हेही वाचा
भाजप खासदार प्रताप सारंगी जमखी ; म्हणाले,”राहुल गांधींनी धक्काबुक्की”





