रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? ; नारायण राणेंचा मार्ग मोकळा?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Kiran Samant । रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून सर्वात महत्वाची बातमी समोर येतीय. याठिकाणी महायुतीकडून उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. सध्या संपूर्ण मतदारसंघात ही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे कोकणातील राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झालाय.
किरण सामंत यांची पोस्ट व्हायरल Kiran Samant ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी निर्णय घेतल्याचे किरण सामंत यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ट्विटरवरुन ट्वीट करत किरण सामंत यांनी माहिती दिली आहे. किरण सामंत यांनी केलेली माघार घेतल्याची पोस्ट आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीतील पेच सुटला असल्याचे दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, साधारणतः रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी किरण सामंत यांनी स्वतः त्यांच्या मोबाईलवरुन व्हॉट्सअॅपवर त्यांच्या ट्विटरवरच्या पोस्टची लिंक काही ग्रुपवर शेअर केली आहे. पण किरण सामंतांनी माघार घेतल्याबाबत जी पोस्ट केली, त्या पोस्टवर कोणीही रिअॅक्ट झालेलं नाही. त्यामुळे किरण सामंतांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
महायुतीकडून नारायण राणेंनाच उमेदवारी ? Kiran Samant ।
नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत किरण सामंत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे अगदी आक्रमकपणे व्यक्त झाले. महत्त्वाची बाब म्हणजे, आज नारायण राणे स्वतः कुडाळमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत आहेत. त्यामुळे कुठेतरी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत की, लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नारायण राणेंनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असून आजचा मेळावा हा त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आहे. याच वातावरतणात किरण सामंत यांची पोस्ट कोकणातील राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार याकडे लक्ष वेधणारी आहे. दरम्यान, अद्याप किरण सामंत यांनी अधिकृतपणे यासंदर्भात किंवा सोशल मीडिया पोस्टबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.





