पोलिस निरिक्षकाने केला डिजीटल विवाह, खर्च दिला स्पर्धापरिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी

Updated On:

श्रीगोंदे-पोलिस निरिक्षक राणी डफळ आणि स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शक किरण निंभोरे यांनी फेसबुक आणि युट्युब लाईव्ह करत विवाह केला. विवाहासाठी लागणारा खर्च पुण्यातील स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या जेवणाच्या सोयीसाठी दिला.

श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी मधील किरण निंभोरे यांचा विवाह येळपणे येतील राणी डफळ यांच्याशी मागील वर्षी ठरलेला होता.आजची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहून, किरणने आत्ताच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही कुटुंबीयांनी किरणला साथ देण्याचा निर्धार केला. लग्नासाठीचा नियोजित खर्च विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरण्याचं ठरवलं. या पैशातून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा दोन वेळच्या जेवणासाठी प्रश्न मार्गी लागणार आहे.

आज २७ एप्रिल रोजी सांयकाळी ४:४५ ला लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टनसिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत,दोघांच्या आई-वडिलांच्या साक्षीने घरामध्येच फेसबुक, यूट्यूब या सोशल नेटवर्किंगच्या सहाय्याने त्यांचा लाईव्ह विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार यांना ऑनलाईन हजेरी लावता आली.

आणखी संबंधित बातम्या

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

2026-03-27 12:08:16

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

Lockdown : कोरोनाने डोकं वर काढलं.! भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात पाहा...

2025-05-20 18:23:43

Lockdown : कोरोनाने डोकं वर काढलं.! भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात पाहा...

"मी माझ्या स्टाईलने..."; खासदार निलेश लंकेंनी अधिकारी आणि ठेकेदाराच्या कानशिलात लगावली?

2025-05-16 11:09:55

"मी माझ्या स्टाईलने...";  खासदार निलेश लंकेंनी अधिकारी आणि ठेकेदाराच्या कानशिलात लगावली?

काय सांगता...! कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये पृथ्वीप्रमाणे चंद्रावरसुद्धा दिसले परिणाम…शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा

2024-10-01 11:43:24

काय सांगता...! कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये पृथ्वीप्रमाणे चंद्रावरसुद्धा दिसले परिणाम…शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा