Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका
आज 96 रुपयाला मिळणारा डॉलर महिन्याभरात 100 रुपयांवर जाईल. तर, महिनाभरात पेट्रोल 120 ते 130 रुपयावर जाईल. त्यांनी यावेळी वाशिमधील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन मारामारी (Jayant Patil) सुरू असल्याचेही सांगितले.

Jayant Patil : आज 96 रुपयाला मिळणारा डॉलर महिन्याभरात 100 रुपयांवर जाईल. तर, महिनाभरात पेट्रोल 120 ते 130 रुपयावर जाईल. त्यांनी यावेळी वाशिमधील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन मारामारी (Jayant Patil) सुरू असल्याचेही सांगितले.
कोरोनावेळी एकदा लॉकडाऊन झाला होता, आता आपोआपच लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (शप) ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
ईश्वरपूरमध्ये शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात पाटील बोलत होते. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, देशाच्या गृहमंत्र्यांनी पंधरा दिवसापूर्वीच आपल्याकडे सहा महिने पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा आहे, असे सांगितले होते.
त्याला अजून महिना झाला नाही, तोवर देशाच्या पंतप्रधानानी खर्च कमी करण्याच्या सूचना देशवासियांना केल्या. अशाच पद्धतीची भूमिका 2013 साली आर्थिक परिस्थिती काठावर आल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती.
त्यावेळी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे, असे ट्विट केले होते. मात्र, तेच मुख्यमंत्री आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची थट्टा करू नका, असे म्हणत आहेत. आता, पंतप्रधानांनी आपला ताफा दोन वाहनांवर आणला.
मुख्यमंत्री तर दुचाकीवरून फिरायला लागले आहेत. याचे अनुकरण महाराष्ट्रातील सर्व मंत्री करतील आणि सर्व मंत्रिमंडळ दुचाकीवर येईल, अशी अपेक्षा करूया. देशावर आर्थिक संकट आले की पहिला शेतकरी, शेतमजूर भरडला जातो. त्यामुळे या संकटातून कसे बाहेर पडायचे यावर विचार करण्याची गरज आहे, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.





