गोळीच्या जखमेवर मलमपट्टी! मोदी सरकारच्या बजेटवर राहुल गांधींचे टीकास्त्र

नवी दिल्ली : गोळीबाराच्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार; अर्थसंकल्पावर राहुल गांधींचा हल्लाबोल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा विक्रम देखील निर्मला सीतारमण यांनी केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पातून नवीन कर प्रणाली आखण्यात आली आहे.
12 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरमधून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यावर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणावर आपल्यासमोरील आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदलांची आवश्यकता होती. मात्र, हे सरकार वैचारिक बाबतीत दिवाळखोर झालं आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसकडूनही या अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प गुंतवणुकीवरीव मंदावलेला व्याजदर, गुंतागुंतीची झालेली जीएसटी प्रणाली, उपभोग्य वस्तूंच्या मागणीमध्ये झालेली घट, किमान मजुरी यासारख्या अर्थव्यवस्थेतील प्रश्नांवर काहीच उपाय सुचवत नाही. तसेच या अर्थसंकल्पामधून एनडीएमधील मित्रपक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारसाठी भरघोस घोषणा केल्या आहेत. मात्र, चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे, असा टोला देखील काँग्रेसने लगावला आहे.
आजचा अर्थसंकल्पही राष्ट्रीय हितावर कमी, राजकीय हितावर जास्त : मायावती
आजच्या अर्थसंकल्पाबाबत मायावती म्हणाल्या कि, देशातील महागाई, गरिबी, बेरोजगारी यांच्या प्रचंड परिणामामुळे तसेच रस्ते, पाणी, शिक्षण, शांतता आणि आराम यासारख्या मूलभूत सुविधांचा अभावामुळे सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील लोकांचे जीवन खूपच कठीण झाले आहे. ज्याचा केंद्रीय अर्थसंकल्प १०० टक्के अडचणीत आहे. याद्वारेही उपाय आवश्यक आहे.
मात्र, काँग्रेसप्रमाणेच, सध्याच्या भाजप सरकारचा अर्थसंकल्पही लोकांच्या आणि राष्ट्रीय हितावर कमी, राजकीय हितावर जास्त केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. जर असं नसेल तर या सरकारच्या काळातही लोकांचे जीवन सतत त्रासदायक, दयनीय आणि दुःखी का आहे? ‘विकसित भारताचे’ स्वप्न बहुजनांच्या हिताचे असले पाहिजे, अशी टीका मायावती यांनी केंद्र सरकारवर केली आहे.





