US Plane Crash: अमेरिकेत मोठा विमान अपघात ; फ्लोरिडाला जाणारे सेसना विमान मिसिसिपी किनाऱ्याजवळ कोसळले
US Plane Crash:

US Plane Crash: अमेरिकेच्या मिसिसिपी किनारपट्टीजवळ, हॉर्न आयलंडजवळ मंगळवारी एक मोठा विमान अपघात झाला. न्यू ऑर्लिन्सहून फ्लोरिडाला जाणारे एक छोटे प्रवासी विमान नियंत्रणाबाहेर जाऊन समुद्रात कोसळले.
विमानात दोन मुलांसह सहा जण होते आणि ते अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच, अमेरिकेच्या तटरक्षक दलाने समुद्रात एक मोठी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.
रडारवरून अदृश्य होण्यापूर्वी विमान वेगाने खाली कोसळले
विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सेसना सेंटुरियन २१० हे विमान लुइझियानामधील न्यू ऑर्लिन्स लेकफ्रंट विमानतळावरून निघाले होते आणि फ्लोरिडातील फोर्ट मायर्स येथील पेज फील्डकडे जात होते.
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या प्रवक्त्याने सांगितले की, हे विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:३० च्या सुमारास पास्कागौलाच्या नैऋत्येला कोसळले आणि दुपारी ३:४५ च्या सुमारास FAA च्या रडारवरून अदृश्य झाले.





