Caribbean Premier League 2024 : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा CPLमध्ये कहर, अवघ्या 19 चेंडूत ठोकल्या 52 धावा…

Caribbean Premier League 2024 & Kiron Pollard : किरॉन पोलार्ड…! नाव ऐकल्यावर फक्त एका अशा फलंदाजाची प्रतिमा डोळ्यासमोर येते, ज्याने आपल्या षटकार मारण्याच्या कलेने जगभर आपली छाप सोडली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड जेव्हा जेव्हा धावा करतो तेव्हा तो जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय बनतो. पोलार्ड आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नसला तरी टी-20 लीगमध्ये तो अजूनही चमकत आहे.
वास्तविक, सीपीएलमध्ये सेंट लुसिया किंग्ज आणि त्रिनबॅगो नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात पोलार्डची वादळी खेळी पाहायला मिळाली. पोलार्डने या सामन्यात अवघ्या 19 चेंडूत खळबळ उडवून दिली. पोलार्डने आपल्या खेळीत एकही चौकार मारला नाही, त्याने फक्त षटकार मारले.
त्रिनबागो नाईट रायडर्सचा कर्णधार पोलार्डने सेंट लुसिया किंग्जविरुद्ध एक अशी खेळी खेळली जी दीर्घ काळासाठी स्मरणात राहील. या सामन्यात पोलार्डने अवघ्या 19 चेंडूत 52 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. यादरम्यान पोलार्डने 7 षटकार ठोकले. पोलार्डच्या या कर्णधार खेळीमुळे त्याच्या संघाला अखेरच्या षटकात 4 गडी राखून सामना जिंकता आला. जेव्हा पोलार्डच्या बॅटमधून धावा निघतात तेव्हा कोणतेही लक्ष्य लहान वाटू लागते. त्याने या सामन्यात 273.68 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
पोलर्डनं असा पलटवला सामना….
त्याने ही खेळी तेव्हा खेळली जेव्हा त्याचा संघ त्रिनिबागो नाइट रायडर्स दबावाखाली होता. सेंट लुसिया किंग्स विरुद्धच्या या सामन्यात एकवेळ त्रिनिबागो नाईट रायडर्सला विजयासाठी 11 चेंडूत 27 धावा करायच्या होत्या. या दडपणाखाली किरॉन पोलार्डने आपले दंबग रूप दाखवत 19 व्या षटकात 4 षटकार ठोकत आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. ज्या संघाला विजयासाठी 11 चेंडूत 27 धावांची गरज होती, तो संघ 5 चेंडूंनंतर लक्ष्यापासून केवळ 3 धावा दूर होता. त्यानंतर अल्झारी जोसेफने शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारून त्रिनिबागो नाईट रायडर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Kieron Pollard is awarded @Dream11 MVP! Well done Polly 🙌🏾 #CPL24 #SLKvTKR #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #Dream11 pic.twitter.com/AASf9KO7mC
— CPL T20 (@CPL) September 11, 2024
कसा झाला सामना?
त्रिनबागो नाईट रायडर्स आणि सेंट लुसिया किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सेंट लुसिया किंग्जने 20 षटकांत 6 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या.
या लक्ष्याचा पाठलाग करणे त्रिनबागो नाइट रायडर्ससाठी सोपे नव्हते. हे लक्ष्य त्यांनी 19.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून किरॉन पोलार्डशिवाय शकरे पॅरिसने 33 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले.




