Caribbean Premier League 2024 : निकोलस पूरनने रचला इतिहास,’अशी’ कामगिरी करणारा जगातील ठरला पहिला फलंदाज…

Nicholas Pooran in Caribbean Premier League 2024 : टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू नेहमीच प्रभावी राहिले आहेत. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड, आंद्रे रसेल यांसारख्या दिग्गजांनी टी-20 क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरनने एक मोठा विक्रम केला आहे. ज्याला तोडणे कोणत्याही फलंदाजासाठी कठीण असेल. कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्याने हा विक्रम केला आहे.
निकोलस पूरन गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून (Trinbago Knight Riders) खेळताना, त्याने सेंट किट्स अॅण्ड नेव्हिस पॅट्रियट्स (St Kitts and Nevis Patriots) संघाविरुद्ध 43 चेंडूत 93 धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 7 षटकार मारले. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
THE NICHOLAS POORAN SHOW IN CPL.
– 93* (43) with 6 fours and 7 sixes, the unreal dominance of Pooran. 🤯pic.twitter.com/k1f0CYfCaj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 23, 2024
निकोलस पुरननं केला हा विक्रम….
या डावात त्याने 7 षटकार लगावले. यासह त्याने साल 2024 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण केले आहेत. टी-20 क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात 150 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. याआधी गेलने 2015 या वर्षामध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 135 षटकार मारले होते. पुरणने 9 वर्षांनंतर त्याचा विक्रम मोडला. पुरण आता टी-20 क्रिकेटमधला नवा सिक्सर किंग बनला आहे.
🚨 𝑯𝑰𝑺𝑻𝑶𝑹𝒀 🚨
Nicholas Pooran becomes the first player in T20 cricket history to smash 150 sixes in a calendar year 🤯🔥#NicholasPooran #WestIndies #T20s #Sportskeeda pic.twitter.com/6nxBJl9mwc
— Sportskeeda (@Sportskeeda) September 23, 2024
टी- 20 क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 8000 धावा…
निकोलस पूरनने टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 361 टी-20 सामन्यांमध्ये 8 हजार 032 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 563 षटकार मारले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो चौथा खेळाडू आहे.





