Dwayne Bravo Jersey : किंग खानच्या संघाकडून ड्वेन ब्राव्होचा CPL मध्ये ऐतिहासिक सन्मान! सचिन-धोनीप्रमाणे मिळाला बहुमान
Dwayne Bravo Jersey : सीपीएलच्या संपूर्ण इतिहासात अशा प्रकारचा सर्वोच्च सन्मान मिळवणारा ब्राव्हो हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

Dwayne Bravo Jersey Number 47 Retired By TKR CPL History : जगातील सर्वोत्तम टी-२० अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) त्याच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करत ट्रिनबॅगो नाइट रायडर्स (TKR) या फ्रँचायझीने त्याची प्रसिद्ध ‘४७’ क्रमांकाची जर्सी निवृत्त (Retire) करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सीपीएलच्या संपूर्ण इतिहासात अशा प्रकारचा सर्वोच्च सन्मान मिळवणारा ब्राव्हो हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
खेळाडू म्हणून ५ तर प्रशिक्षक म्हणून १ किताब; CPL चा खरा चॅम्पियन –
ड्वेन ब्राव्हो हा सीपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय चेहरा राहिला आहे. त्याने खेळाडू म्हणून ५ वेळा, तर मुख्य प्रशिक्षक म्हणून १ वेळा अशा एकूण ६ सीपीएल जेतेपदांवर नाव कोरले आहे. आपल्या सीपीएल कारकिर्दीत १०७ सामने खेळून त्याने सर्वाधिक १२९ विकेट्स घेतल्या आहेत. मोक्याच्या क्षणी गोलंदाजी आणि फटकेबाजी करून सामने जिंकून देण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे ट्रिनबॅगो नाइट रायडर्स ही स्पर्धेतील सर्वात यशस्वी टीम ठरली.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५८२ टी-२० सामने अन् ६३१ विकेट्सचा डोंगर –
🚨Jersey No.47 Is Gone Forever🚨
– CPL team TKR Retired Jersey No.47
-Dwayne Bravo becomes the First player
in CPL history to have his jersey number
retired-5 titles as a player
-1 as a coach
-129 CPL wickets pic.twitter.com/JONP3hY8vc— VEER SA (@veersaa007) August 30, 2026
ब्राव्होने २०२४ मध्ये सक्रिय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी तो प्रशिक्षकाच्या भूमिकेतून संघाशी जोडला गेला. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ४० कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ९१ टी-२० सामने खेळले. एकूण टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ५८२ सामने खेळत त्याने ६३१ विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. डेथ ओव्हर्समधील त्याचे स्लोअर यॉर्कर्स आणि डान्स सेलिब्रेशन जगभरातील चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहतील.
‘त्याचे योगदान शब्दांपलीकडचे!’; नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचे गौरवोद्गार –
Jersey Number 4️⃣7️⃣. Forever etched in HISTORY 📜
Dwayne Bravo | #TKRvJK | #WeAreTKR | #TrinbagoKnightRiders | #CPL26 pic.twitter.com/R1Ulfpr5Ld
— Trinbago Knight Riders (@TKRiders) August 29, 2026
नाइट रायडर्स ग्रुपचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “टीम आणि सीपीएल स्पर्धेसाठी ब्राव्होचे योगदान इतके अथांग आहे की ते आकडेवारीच्या पलीकडचे आहे. त्याची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त करून फ्रँचायझीशी असलेली त्याची ओळख कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. सीपीएलमध्ये हा सन्मान मिळवण्यासाठी ब्राव्होपेक्षा अधिक योग्य खेळाडू कोणीच असू शकत नाही.”





