Kieron Pollard : पोलार्ड तात्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील एकमेव खेळाडू

Kieron Pollard world Record : कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) 2025 च्या अंतिम सामन्यात त्रिनबागो नाइट राइडर्सने गयाना अॅमेझॉन वॉरियर्सवर 3 गडी राखून विजय मिळवत विक्रमी पाचव्यांदा सीपीएलचे जेतेपद पटकावले. या सामन्यात त्रिनबागोच्या विजयात किरॉन पोलार्डच्या अनुभवाचा मोठा वाटा राहिला. या विजेतेपदासह पोलार्डने टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक खिताब जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
ड्वेन ब्रावोचा मोडला विक्रम –
निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली त्रिनबागो नाइट राइडर्सने हा विजय मिळवला असला, तरी पोलार्डच्या फलंदाजीतील योगदानाने संघाला मोठा आधार मिळाला. पोलार्डने टी-20 क्रिकेटमधील 18 वा किताब जिंकत ड्वेन ब्राव्होचा 17 किताबांचा विश्वविक्रम मोडला. पोलार्डने 15 वेगवेगळ्या संघांकडून खेळताना 18 अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सीपीएल व्यतिरिक्त त्याने आयपीएल, बीपीएल, एमएलसी, सीएसओ टी-20 चॅलेंज आणि आयएलटी-20 मध्येही किताब जिंकले आहेत.
𝐕 are the Champions 🏆#WeAreTKR | #TrinbagoKnightRiders pic.twitter.com/3KyLeJykXB
— Trinbago Knight Riders (@TKRiders) September 22, 2025
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक किताब जिंकणारे खेळाडू –
- किरॉन पोलार्ड – 18
- ड्वेन ब्रावो – 17
- शोएब मलिक – 16
- सुनील नरेन – 12
- आंद्रे रसेल – 11
- रोहित शर्मा – 11
- कॉलिन मुनरो – 10
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानचा पुन्हा एकदा रडीचा डाव! भारताविरुद्धच्या पराभवानंतर ICC कडे केली ‘ही’ तक्रार
सीपीएल 2025 मध्ये पोलार्डचे शानदार प्रदर्शन –
𝑨𝒏𝒐𝒕𝒉𝒆𝒓 𝒔𝒆𝒂𝒔𝒐𝒏, 𝒂𝒏𝒐𝒕𝒉𝒆𝒓 𝒑𝒊𝒆𝒄𝒆 𝒐𝒇 𝒔𝒊𝒍𝒗𝒆𝒓𝒘𝒂𝒓𝒆. 🏆
Kieron Pollard stands tall with a record 1️⃣8️⃣ T20 trophies to his name! 😎✨#CPL2025 #KieronPollard #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/k7nQyBKvet
— Sportskeeda (@Sportskeeda) September 22, 2025
किरॉन पोलार्डने सीपीएल 2025 मध्ये 13 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 54.71 च्या सरासरीने आणि 174.09 च्या स्ट्राइक रेटने 383 धावा केल्या. त्रिनबागोसाठी तो चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर संपूर्ण हंगामात तो सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
हेही वाचा – IND vs PAK : तिलक वर्माने रघु यांच्या पाया पडून जिंकली चाहत्यांची मने! नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO
अंतिम सामन्यात गयाना अॅमेझॉन वॉरियर्सविरुद्ध त्याने 12 चेंडूंमध्ये 21 धावांची खणखणीत खेळी केली, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. पोलार्डच्या अनुभव आणि नेतृत्वाने त्रिनबागोला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, आणि त्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले.





