IND vs PAK : पाकिस्तानचा पुन्हा एकदा रडीचा डाव! भारताविरुद्धच्या पराभवानंतर ICC कडे केली ‘ही’ तक्रार

IND vs PAK PCB Complaint ICC : आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून दणदणीत पराभव दिला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) फखर झमानच्या झेलबादच्या निर्णयावर आक्षेप घेत तक्रार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पीसीबीचा दावा आहे की, टीव्ही पंच रुचिरा पल्लियागुरुगे यांनी फखरला चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले.
सॅमसनच्या झेलवर पीसीबीचा आक्षेप –
ही घटना सामन्याच्या तिसऱ्या षटकात घडली. भारताचा यष्टिरक्षक संजू सॅमसनने घेतलेला झेल खरोखर क्लीन होता की नाही? हे तपासण्यासाठी निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यात आला. फखरने त्या वेळी 8 चेंडूत 15 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तान मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता.
Wickets ka 𝐇𝐀𝐑𝐃𝐈𝐊 swaagat, yet again 🤩
Hardik Pandya nicks one off Fakhar Zaman 🔥
Watch #INDvPAK LIVE NOW, on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/19fR5GiMn3
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 21, 2025
रुचिरा यांनी दोन वेगवेगळ्या कोनातून झेल तपासला. एका कोनातून चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसले, तर दुसऱ्या कोनातून सॅमसनने झेल क्लेअर घेतल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस, दुसऱ्या कोनाच्या आधारावर रुचिरा यांनी फखरला झेलबाद ठरवले. या निर्णयाने फखर नाराज झाला, तर सोशल मीडियावरही याबाबत मतभेद निर्माण झाले.
हेही वाचा – IND vs PAK : तिलक वर्माने रघु यांच्या पाया पडून जिंकली चाहत्यांची मने! नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाचा आक्षेप –
सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्याने सांगितले की, त्याच्या मते हा झेलबाद नव्हता. “पंचही चूक करू शकतात. मला वाटले की यष्टीरक्षकापर्यंत पोहोचण्यापूर्वी चेंडूचा जमिनीला स्पर्शला झाला होता. मी चुकीचा असू शकतो. पण फखर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, जर तो पॉवरप्लेमध्ये टिकला असता, तर आम्ही कदाचित 190 धावा करू शकलो असतो,” असे सलमानने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.





