जकार्ता – मानवी अवयवांच्या तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास इंडोनेशियातील पोलिसांकडून केला जातो आहे. या रॅकटमध्ये काही पोलीस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या टोळीने इंडोनेशियातील 122 जणांना किडनी विक्रीसाठी कंबोडियाला पाठवले असल्याच्या आरोपाचा तपास इंडोनेशियातील पोलिसांकडून केला जातो आहे.
या संदर्भात इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी 19 जुलै रोजी 12 जणांना अटक केली असून, बेकायदेशीरपणे केल्या जात असलेल्या मानवी अवयवांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या इतर काही जणांचा शोध घेतला जातो आहे, असे सामान्य गुन्ह्यांसाठीचे जकार्ता पोलिसांचे संचालक हेंगकी हरयादी म्हणाले.
कंबोडियातील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आलेले सर्व 122 जण परत आले आहेत. यामध्ये फॅक्टरी कामगार, शिक्षक आणि एक्झिक्युटिव्हचाही समावेश आहे. यातील बहुतेकांची नोकरी करोनाच्या साथीदरम्यान सुटली असून, त्यांना पैशांची नितांत गरज आहे. यातील सहा किडनी दाते अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
आणखीन काही जणांचा शोध पोलीस घेत आहेत आणि त्यांचा जबाब तपासासाठी नोंदविणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. संशयितांपैकी 9 जणांनीही पूर्वी किडनी विकली आहे. त्यांनी लोकांना पैशाचे आमिष दाखवून किडनी विकण्यास तयार केले असल्याचा आरोप आहे. अशा लोकांना हेरण्यासाठी ते सोशल मीडियाचा आधार घेत असत.
दहावा संशयित लोकांना किडनी विकण्यासाठी कंबोडियाला घेऊन जात असे. हा बेकायदेशीर उद्योग 2019 पासून सुरू होता आणि त्यातून अंदाजे 24.4 रुपियाह (1.6 दशलक्ष डॉलर) रुपये कमावले गेले होते. किडनी विकणाऱ्याला 135 दशलक्ष रुपियाह(9 हजार डॉलर)चे आमिष दाखवले जात असे.