दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण; एकाने केली स्वत:ची सुटका, शोध मोहीम सुरू

Jammu And Kashmir | जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यानंतर काही वेळातच दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य उघडकीस आले आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी टेरिटोरिअल आर्मीच्या दोन जवानांचे अपहरण केले आहे. यातील एक सैनिक अपहरणानंतर पळून जाण्यात यशस्वी झाला.
ही माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबविली जात आहे. जवानांच्या अपहरणानंतर सैन्य दलाने बंदोबस्त वाढविला असून परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. अनंतनागच्या जंगल भागात या जवानांची तैनात करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करून आलेल्या जवानाकडून या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, 2020 मध्ये दहशतवाद्यांनी असेच भ्याड कृत्य केले होते. त्यानंतर टेरिटोरियल आर्मीचा शिपाई शाकीर वाज याचे काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आले होते. 24 वर्षीय शाकीर वाज हा दक्षिण काश्मीरमधील हरमन, शोपियान येथील त्यांच्या घराजवळून बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर पाच दिवसांनी कुटुंबीयांना शाकीर यांचे कपडे घराजवळ सापडले. ही घटना 2 ऑगस्ट रोजी घडली.
शाकीर दक्षिण काश्मीरमधील बालापूर येथे 162 -टीएमध्ये तैनात होते. बराच शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. एक वर्षानंतर सप्टेंबरमध्ये शाकीर यांचा मृतदेह काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सापडला होता.





