Khopoli Municipal Council: “आधीच्या बदकांचं काय झालं?” शंकर मंदिर तलावाच्या कोट्यवधींच्या खर्चावर गंभीर आक्षेप
Khopoli Municipal Council: खोपोलीतील ऐतिहासिक शंकर मंदिर तलावाच्या विद्युत रोषणाईवर होणाऱ्या निरर्थक खर्चाला स्थगिती देण्याची अॅड. संदेश धावारे यांची मागणी.

Khopoli Municipal Council – खोपोली शहरातील शंकर मंदिर शेजारील पेशवे कालीन तलावात सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रूपये खर्च करून बदके आणि कारंजे लाइट बसविली होती, त्याचा खोपोलीकरांना कुठही थांगपत्ता लागत नाही. पालिकेचे लाखो रूपये पाण्यात बुडाले असून संबंधित ठेकेदारावर कोणताही कारवाई केली नाही आणि आता पुन्हा तलावात विद्युत रोषणाई केली जात असल्याचा आक्षेप अॅड.संदेश धावारे यांनी घेतला आहे.
अॅड. धावारे यांनी कलम 308 अनुषंगाने कामाचा ठराव रद्द करण्यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. पेशवे कालीन तलावातून संपूर्ण खोपोलीकरांना सध्या एकवेळच पाणीपुरवठा केला तो दोन वेळ करण्यासाठी प्रयत्त करावा तसेच तलावाच्या समोरील भागाचे इमारती आहे, त्यांचे ड्रेनेजचे पाणी तलावात झिरपत आहे त्याची व्यवस्था करून खोपोलीकरांना स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
तलावातील विद्युत रोषणाईवर होणारा खर्च हा पूर्णपणे निरर्थक आहे, या पैशात खोपोलीकरांना स्वच्छ पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे विद्युत रोषणाईचे काम थोडी थांबून ते रद्द करावे आणि जनतेच्या मूलभूत गरजांकडे अशी मागणी अँड.संदेश धावारे यांनी केली आहे. शंकर मंदिर तलावातील विद्युत रचनेच्या कामास तात्काळ समिती देण्यात यावी संबंधित सबंधित ठरावाची वैधता ही तपासण्यात यावी.
यापूर्वी झालेला सर्व खर्चाचे विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे. कामाच्या प्रचिती प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीची चौकशी करण्यात यावी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पुढील निधी खर्च करण्यात मनाई करण्यात यावी, मंदिर तलावावर यापूर्वी झालेल्या खर्चाची तांत्रिक आर्थिक चौकशी करण्यात यावी पूर्वी केलेला कामाची पुस्तके व निविदा देयक व इतर अभिलेखा तपासणी करण्यात यावी अशीही मागणी अॅड.संदेश धावारे यांनी केली आहे.




