खेड-आळंदी विधानसभा मतदासंघ: 13 उमेदवारमध्ये लढत, 22 पैकी 9 उमेदवारांनी घेतली माघार

राजगरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदासंघातील एकूण 22 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.
या उमेदवारांनी घेतली माघार; अक्षय ज्ञानेश्वर जाधव (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), सुरेखा दत्तात्रय मोहिते, मयूर दिलीप होले, अरविंद बाळासाहेब पानमंद, सुधीर विठ्ठल मुंगसे, अतुल महादेव देशमुख, अमोल बाजीराव दौंडकर, अंकुश सुदाम राक्षे, मनोहर महादू वाडेकर (सर्व अपक्ष).
खेड आळंदी विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 76 हजार 623 मतदार असून त्यापैकी 1 लाख 93 हजार 719 पुरुष, 1 लाख 82 हजार 892 व इतर 12 असे उमेदवार आहेत. सैनिक मतदार 306 आहेत. 389 मतदान केंद्र आहेत. रेंज न येणारी 6 मतदान केंद्रे आहेत. मतदारसंघात संवेदनशील केंद्र तालुक्यात एकही नाही. होम व्होटिंग 120 अर्ज आले आहेत 85 पेक्षा जास्त वयाचे 85 मतदार असून 45 दिव्यांग मतदार आहेत त्यांच्या घरी जाऊन अधिकारी मतदान करून घेणार आहेत.
खेड-आळंदी विधासनभा मतदार संघात मतदान व मतमोजणीसाठी 2278 कर्मचारी अधिकारी काम करणार आहेत. खर्च मर्यादा 40 लाख असून त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सीव्ही जिल ऍप मतदारांनी मोबाईलवर डाउनलोड करून घेऊन त्याद्वारे आचारसहिंता भंग तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. खर्चाची तपासणी तीन टप्प्यात होणार आहे दिनांक 1113,18नोव्हेंबर रोजी खेड तहसीलदार कार्यालयात सकाळी 10ते 5या वेळेत होणार आहे.
दरम्यान, खेड-आळंदी विधानसभा निवडणूक दुरंगी होणार असल्याचे चित्र माघारी नगर स्पष्ट झाले आहेत अपक्ष उमेदवार अतुल देशमुख आणि महाराष्ट्र सुराज्य पक्षाचे अक्षय जाधव यांनी माघार घेतल्याने घड्याळ विरूद्ध मशाल असा सामना होणार आहे. अतुल देशमुख यांची माघारी चर्चेचा विषय झाला आहे. अतुल देशमुख यांनी माघारी नंतर सांगितले, पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुढील भवितव्यासाठी काही सूचना मार्गदर्शन केल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी उमेदवारी अर्ज निवडणुकीत मागे घेतला आहे.
हे उमेदवार रिंगणात-
अनिकेत मुरलीधर गोरे( बहुजन समाज पार्टी, हत्ती), दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ), बाबाजी रामचंद्र काळे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल), रवींद्र राहुल रणदिवे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), अमर मछिंद्र बो-हाडे (अपक्ष, ट्रम्पेट), भूदेव कान्हू शिंदे (अपक्ष, हिरा), निळोबा चांगदेव गायकवाड (अपक्ष, गॅस शेगडी), प्रकाश जिजाबा काळे (अपक्ष, दूरदर्शन), किसान सखाराम गोपाळे (अपक्ष, शिट्टी), साहेबराव नारायण जाधव (अपक्ष, दुर्बीण), सागर गंगाराम बनसोडे (अपक्ष, अॅटोरिक्षा), सुनील विठ्ठल पवार (अपक्ष, कॅमेरा), अमित सुमंतराव गडदे (अपक्ष, एअर कंडिशनर).
काही काळ तणावाचे वातावरण –
अतुल देशमुख यांच्या माघारीच्या वेळी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के,अंकुश काकडे, खेड तालुका अध्यक्ष हिरामण सातकर,आदी उपस्थित होते. अतुल देशमुख यांच्या माघारीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण होते. यावेळी अतुल देशमुख यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.





