पुणे जिल्हा | महाविकास आघाडीत बिघाडी ; काँग्रेसकडून दौंडकरांचा अर्ज दाखल
Updated On:

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून काँग्रेसचे उमेदवार अमोल बाजीराव दौंडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यामागील अनेक निवडणुकांमध्ये खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात आघाडीत काँग्रेस पक्षाला विचारात घेतले जात नसल्यची खंत तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी व्यक्त करीत पक्षातील कार्यकर्ते अमोल दौंडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष विजय डोळस, महिला प्रदेश सदस्य वंदना सातपुते, सतीश राक्षे, आदी उपस्थित होते





