“खटा खट, टका टक लूट शुरू…”; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाजपने काँग्रेसवर साधला निशाणा

BJP On Fuel Price Hike| कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ केली आहे. ‘कर्नाटक सेल्स टॅक्स’मधील बदलानंतर ही वाढ झाली आहे. कारण राज्य सरकारने विक्रीकरात 29.84% आणि 18.44% वाढ केली आहे. यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत लूट सुरू झाल्याचे म्हंटले आहे.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी X वर पोस्ट करताना लिहिले की, कर्नाटकात परिस्थिती बदलत आहे. त्याचबरोबर पेट्रोल 3 रुपयांनी महागले आहे. तर टकाटक-टकटक डिझेल 3.2 रुपयांनी महागले आहे. पेट्रोलवरील विक्रीकर 25.92% वरून 29.84% आणि डिझेलवर 14.3% वरून 18.4% करण्यात आला आहे. या वाढीनंतर बेंगळुरूमध्ये पेट्रोल 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 85.93 रुपये प्रति लिटर झाले आहे.
खटा खट, टका टक लूट शुरू… pic.twitter.com/gHUHiMaVgC
— Amit Malviya (@amitmalviya) June 15, 2024
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटले की, “काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस पक्ष म्हणतो की देशात महागाई आहे आणि मग काँग्रेस पक्ष आणि त्यांचीच राज्य सरकारे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत आहेत. कर्नाटकात त्यांनी शेतकरी विरोधी, सामान्य माणसाच्या विरोधातील आदेश, फतवे, जिझिया कर पारित केला आहे आणि त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती3 रुपये आणि 3.05 रुपयांनी वाढवल्या आहेत.”
दरम्यान, कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर वाढवण्याचा निर्णय घेतल्याने किमती महागल्या आहेत. त्यानुसार बेंगळुरूमध्ये आता पेट्रोलची किंमत 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 85.93 रुपये प्रति लीटर आहे. तर उर्वरित देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.
तर महाराष्ट्रातील परभणीत एक लिटर पेट्रोलची किंमत 107.33 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 93.74 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. दरम्यान, कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर वाढवण्यास भाजपने विरोध केला आहे.
हेही वाचा:
‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटात श्रेयस तळपदेची एन्ट्री; साकारली महत्त्वाची भूमिका





