khashaba Movie : ‘खाशाबा’मधून पुन्हा घडणार नवा स्टार? परश्या, जब्या नंतर कोण असणार नागराज मंजुळेंचा नवा हिरो, पाहा….
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा‘ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

khashaba Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा‘ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. khashaba Movie
स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या संघर्ष, जिद्द आणि ऐतिहासिक कामगिरीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (khashaba Movie)
विशेष म्हणजे, या चित्रपटातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अभिनय क्षेत्रात एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत झळकणार असून, त्यांनी साकारलेली भूमिका ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशीही भावनिक नाते सांगणारी आहे. (khashaba Movie)
यासोबतच चित्रपटात कलाकारांचीही तगडी फौज पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, ओम भूतकर यांच्यासह स्वतः नागराज मंजुळे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. (khashaba Movie)
परंतु मुख्य खाशाबा जाधव यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे परश्या आणि जब्यानंतर कोण असेल नवा अभिनेता? याची प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे.
नव्या सिनेमांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीला नवे कोरे चेहरे मिळतात आणि पहिल्याच सिनेमात प्रसिद्धही होता. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. सिनेमाच्या टिझरमध्येही अभिनेत्याचा चेहरा थेट दाखवलेला नाही. (khashaba Movie)
हे देखील वाचा : Khashaba Teaser : कुस्तीच्या आखाड्यातून ऑलिम्पिकपर्यंतचा थरार! ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर रिलीज, मुख्य भूमिकेत…
‘खाशाबा’ हा केवळ एका महान खेळाडूचा चरित्रपट नसून, संघर्ष, जिद्द, देशप्रेम आणि इतिहासाचा अभिमान जपणारी प्रेरणादायी कहाणी असल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक भव्य सिनेमॅटिक अनुभव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.





