Nana Patole: अशोक खरात प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद उमटणार; विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची पटोलेंची माहिती
Nana Patole: 'खरातसोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का?'

Nana Patole: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या दृष्कृत्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. याप्रकरणी रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा द्यावा लागला.
यानंतर आता भोंदूबाबा अशोक खरात याच्या दृष्कृत्यांची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.
अशोक खरात प्रकरणी आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
खरात प्रकरणी राज्य सरकारने खुलासा केला पाहिजे. रुपाली चाकणकर एक महिला असल्याने त्यांना टार्गेट केलं जात आहे का? खरातसोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. Nana Patole
तसेच या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी तीन दिवसातच एसटी स्थापन केली. एसटीची मागणी कुणीही केलेली नसताना राज्य सरकारने एसटी स्थापन का केली?, अशीही विचारणा त्यांनी केली.
मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी नाशिकचाच मुद्दा घेतला होता. आता खरात कोण आहे, ते समोर आलं आहे. मी विधानसभेत पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, तो मुख्यमंत्र्यांनी का लपवला? प्रकरण तेव्हाच उघडकीस आले असते.
अधिकारी, मंत्री सुद्धा सहभागी Nana Patole
राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असताना त्यांनी सांगितली होती, अशी कुठलीही घटना घडली नाही. खरातच नाही तर, नाशिकमध्ये आणखी एक आहे ज्यामध्ये काही अधिकारी, मंत्री सुद्धा सहभागी आहेत, असा गौप्यस्फोटही पटोले यांनी केलाया.
दरम्यान, ज्या नाशिकमध्ये महाकुंभ होत आहे तिथं अशी घटना घडते आणि यात महाराष्ट्र बदनाम होत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणून राज्य सरकारला खुलासा मागणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा:






