Kharadi Murder: कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट! पतीने दारूच्या नशेत पत्नीसोबत जे केलं, ते वाचून अंगावर काटा येईल
Kharadi Murder: पुण्यात कौटुंबिक वादातून विवाहितेची निर्घृण हत्या; उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले, पोलीस प्रशासनाकडून तपास वेगात.

Kharadi Murder – खराडीत कौटुंबिक वादातून गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन विवाहितेचा बुधवारी (दि.२४) खून करण्यात आला. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तो पसार झाला आहे. पहाटे गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर वार करून पतीने कान, नाक कापले आहेत. किरण (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) या विवाहितेचा खून झाला असून पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) याने खराडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आरोपी हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो. त्याची पत्नी किरण ही खराडी परिसरात घरकामे करते. बाबर दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होते. बुधवारी (२४ जून) पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत होती.
शेजारी मुले झोपली होती. आरोपीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने किरणचे नाक आणि कान तीक्ष्ण शस्त्राने कापले. गंभीर जखमी झालेल्या किरणला भाऊ दादू याने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टारांनी सांगितले. पती पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आरोपीने खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र मिळालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव तपास करत आहेत.





