Khandala News : खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
Khandala News : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. (खंडाळा-म्हावशी) च्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला आहे.

Khandala News : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी दि. २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Khandala News)
सोमवारपासून (दि. १९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २०२६- २७ ते २०३१- ३२ या कालावधीसाठी संचालक मंडळांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार दि. १९ ते २६ ऑक्टोंबरपर्यंत रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत खंडाळ्याच्या सहाय्यक निंबधक (सहकारी संस्था) कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. (Khandala News)
त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २७ रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया, तर दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.२८ ऑक्टोबर ते दि. १२ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. (Khandala News)
निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. आवश्यक वाटल्यास दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि. २४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत. (Khandala News)
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक डॉ. प्रगती बागल काम पाहणार असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडाळ्याच्या सहाय्यक निबंधक प्रीती काळे व वाईचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर काम पाहणार आहेत. (Khandala News)





